आमदार अपात्रतेबाबत आज पुन्हा सुनावणी
शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदार अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. परस्परविरोधी करण्यात आलेल्या ३४ याचिका दाखल करण्यात आल्या असून या याचिका सहा गटात वर्गिकरण करण्यात आल्या आहेत. यातील प्रमुख याचिकांवर आज एक वाजता सुणावणी होणार आहे.
आमदार अपात्रता याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यास शिंदे गटाच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला होता. प्रत्येक आमदाराची बाजू ऐकून घ्यावी असे शिंदे गटाचे म्हणणे होते.तसेच पुरावे सादर करण्यासाठी अधिक वेळ मागितला होता. याला ठाकरे गटाच्या वकिलांनी विरोध करत सुनावणी लवकरात लवकर घेऊन निकाल देण्याची मागणी केली होती. विधानसभा अध्यक्षांसमोर या मुद्यावर १३ ऑक्टोबरला सुनावणी झाली होती.
दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या परस्परविरोधातील आमदार अपात्रता याचिकांवर येत्या ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राहुल नार्वेकर यांना दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार राहुल नार्वेकर दिल्लीला जाऊन महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार असल्याची माहिती होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत