मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

बीडमध्ये जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे 7 गुन्हे दाखल

गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी आधी उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यानंतर नेत्यांना गावबंदी करण्यात आली. आता तर आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू केली आहे. राजकारण्यांची घरे पेटवली जात आहेत. त्यांची वाहने अडवली जात आहेत. राज्यभरात आतापर्यंत 141 गुन्हे दाखल झाले आहेत. बीडला या आंदोलनाची सर्वाधिक झळ पोहोचली आहे. बीडमध्ये जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. राज्यात मराठा आंदोलनाचे 141 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत 168 लोकांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात 146 आरोपींना 41 अ नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये 54 गुन्हे दाखल करण्यात आले असून 106 जणांना अटक करण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!