जसं डॉक्टरांच्या नावामागे Dr लावतात, तसंच आता राज्यातील शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार. –

प्रलंबित मागण्या, शैक्षणिक सोयी सुविधा, वेळेवर वेतन यावर काम करायचं सोडून नुसत्याच कोलांट्या उड्या.
एकीकडे आपल्यापेक्षा लहान राज्य असलेले आणि राजकारणाचा कमी अनुभव असलेले दिल्ली राज्य शिक्षण यंत्रणेवर प्रभावी नियंत्रण मिळवत असताना आपला महाराष्ट्र मात्र अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ पैसा आणि श्रम वाया घालवत आहे.
जसं डॉक्टरांच्या नावामागे Dr लावतात, वकिलांच्या नावामागे लावतात तसंच आता राज्यातील शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार आहे. शिक्षकांच्या नावा मागे Tr लावण्याचा निर्णय शिक्ष खात्याने घेतला आहे. शिक्षकांच्या नावा मागे Tr लावावे असा आदेशच जारी करण्यात आला आहे.
यापुढे शिक्षकांच्या नावापुढे इंग्रजीमध्ये Tr लिहीले जाणार आहे. तर, मराठीमध्ये शिक्षकांच्या नावामागे टी असं लिहिण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नावामागे Tr अक्षर लागल्यामुळे राज्यातील लाखो शिक्षक हे त्यांच्या नावानेच ओळखले जाणार आहेत. शिक्षकांच्या नावावरुनच त्यांचे प्रोफेशन समजणार आहे.
महिला शिक्षकांनी साडी अथवा चुडीदार /सलवार, कुर्ता, दुपट्टा अशा प्रकारचा भारतीय पोषाक परिदान करुनच शाळेत यावे. पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर परिधान करावी. पॅन्ट शर्ट अगदी व्यवस्थित इन केलेले असावे असे देखील ड्रेस कोडमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. पुरुष तसेत महिला शिक्षकांनी जीन्स पँट अथवा वेस्टर्न आऊटफीट परिधान करुन शाळेत येवू असे देखील या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
यापेक्षा दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्याने धोरण आखावे असे मत विद्यार्थी शिक्षक व पालक वर्गातून व्यक्त होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत