महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं होणार अनावरण.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उद्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत आहे. या पुतळ्याची निर्मिती अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केली आहे. २२ फुट उंचीचा हा पुतळा असून सचिनच्या हातातील बॅट चार फूट लांबीची आहे. सचिनचं हे शिल्प एका ग्लोबवर उभारण्यात आलं आहे. या ग्लोबवर जगाचा नकाशा आहे. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत गोलंदाज फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या चेंडूवर सचिननं षटकार ठोकला तो क्षण या पुतळ्याच्या रूपानं कायम स्मरणात राहणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत