मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

02 नोव्हेंबर 2023 रोजी,स्मृती बुद्ध विहार भीम नगर उस्मानाबाद येथे धम्म फेरी,वर्षावास सांगता,धम्म प्रवचनाच्या कार्यक्रमास बौद्ध उपासकांनी उपस्थित रहावे !

उस्मानाबाद : दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 09.30 वा,स्मृती बुद्ध विहार येथून धम्म फेरी आणि वर्षावास सांगता,धम्म प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया ता.शाखेच्या वतीने करण्यात आलेले आहे.तरी समस्त बौद्ध उपासकांनी उपस्थित राहून तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीस गतिमान करण्यासाठी सहकार्य करावे,ही नम्र विनंती !
कार्यक्रमाचे स्वरूप :————–
सकाळी ठीक 09.30 वा स्मृति बुद्ध विहार उस्मानाबाद येथून धम्म फेरीचे आयोजन सकाळी ठीक 10.30 वा,स्मृति बुद्ध विहार येथे धम्म फेरीचा समारोप व सामूहिक त्रिसरण पंचशील वंदना घेणे बौद्ध धम्मातील पवित्र वर्षावासाचे संपूर्ण चार महिने पालन करणाऱ्या श्रद्धावान बौद्ध उपासक/उपासिकांचा व धम्म प्रचारकांचा आणि आप-आपल्या गाव/वस्ती/गल्ली मध्ये वर्षावास धम्म प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सन्मानीय कार्यकर्त्यांचा यथोचित मान-सम्मान कार्यक्रम. बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम यानंतर सामूहिक अन्नदान आणि कार्यक्रमाची सांगता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
मा.विजयमाला सुरेश धावारे
(जि.अध्यक्ष,भारतीय बौद्ध महासभा)
मा.अरुणभाऊ रेवाप्पा माने
(जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,बेंबली)
मा.काजलताई प्रदीप गायकवाड
(धम्म अभ्यासक शाहू नगर)
मा.शिलाताई मारुती पवार
(नालंदा महिला मंडळ शाहू नगर)
मा.वनमाला माणिक बनसोडे
(सिद्धार्थ नगर,उस्मानाबाद)
मा.जयश्री दादाराव चव्हाण
(बौद्ध नगर,उस्मानाबाद)
मा.सुनील देविदास बनसोडे
(बौद्ध उपासक,उस्मानाबाद)
(सूचना : वरील कार्यक्रमासाठी जिल्हा कार्यकारणी,केंद्रीय शिक्षक तालुका,कार्यकारणी,बौद्धाचार्य,
श्रामनेर,ग्रामशाखा इत्यादी सर्व शाखांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पउपस्थित राहणे दिनांक 28/10/ 2023 च्या बैठकी नुसार अध्यक्षांच्या आदेशानुसार बंधनकारक आहे.)
आयोजक व निमंत्रक :———–
जिल्हा कार्यकारिणी,तालुका कार्यकारिणी (दक्षिण) उस्मानाबाद

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!