राष्ट्रवादी काँग्रेस श प ची”शिव स्वराज्य यात्रा” म्हणजे न्याय नाकारणारी ढोंग यात्रा”

ऍड अविनाश टी काले , अकलूज
मो न :-9960178213
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षाचे वतीने महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातील बहुजन जनतेला छत्रपती शिवराय यांच्या नावाने भावनिक बनवण्या साठी” शिव स्वराज्य”हे नाव घेऊन 31विधान सभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात ही यात्रा फिरणार आहे .
आणि “रयतेचे राज्य ” स्थापन करण्यासाठी ही यात्रा असेल असे प्रवचन राष्ट्रवादी काँग्रेस श प पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ जयंत पाटील साहेब यांनी माध्यमांना सांगितले .
त्यांच्या या घोषणेला कांहीं बहुजन बळी पडतील असा त्यांचा गोड गैरसमज आहे .
छ्त्रपती शिवरायांचे राज्य हे रयतेचे का झाले? याचे कारण त्यांची रयतेच्या प्रति असलेली बांधिलकी , त्यांच्या हिताची जोपासना करण्यासाठी त्यांची समर्पण वृत्ती , आणि त्यांची न्याय प्रियता त्यास कारणीभूत होती.
छत्रपती शिवराय यांच्या सद्गुण पैकी 5%तरी सद्गुण व खरेपन राष्ट्रवादी काँग्रेस कडे आहे काय ? याचे आत्मपरीक्षण ते करणार आहेत काय? हा खरा प्रश्न आहे .
त्यांचे वर्तन पाहता त्यांच्या जहागिरी कायम रहाव्यात , आणि त्यांची हुजरे गिरी करणाऱ्यांना बक्षिसी मिळावी म्हणून इतरांच्या न्याय हक्कावर गदा आणून मागास वर्गीय समाजाचे खोटे दाखले काढून मागास वर्गीय समाजाच्या आरक्षित जागेवर दिवसा ढवळ्या दरोडे टाकणारे हे आधुनिक काळातील सत्ता पिपासू दरोडेखोर आहेत .
त्यांच्या तोंडी छत्रपती शिवरायांचे नाव ही शोभत नाही , आणि त्यांनी शिव स्वराज्याचे नाव ही तोंडात घेऊ नये.
तो हक्क त्यांना अजिबात राहिलेला नाही.
शिवकालातील त्यांच्या कठोर न्यायदानाचे अनेक किस्से आहेत .
त्यांचा न्याय कसा होता , एखाद्याच्या मृत्यू नंतर ही त्याचा हक्क न
डावलनारे राजे होते .
“मराठेशाही”म्हणून प्रवीण जी भोसले हे इतिहास तज्ञ आहेत . आणि ते जे मांडणी करतात ती लेखी पुराव्या निशी असते .
बाजी पासलकर यांच्या संदर्भातील देशमुखी चां हक्क या संबंधाने त्यांनी एक हकीगत सांगितलेली आहे .
“मोर्से खोऱ्याची देशमुखी पासलकर यांच्या कडे होती , यातील यशवंत हे पासलकर यांच्या घरातील थोरल्या शाखेचे तर बाळाजी पासलकर हे हे मधल्या शाखेचे , कांहीं कारणाने ही देशमुखी मधल्या कडे आणि धाकट्या शाखेकडे फिरत राहिली व हा शिक्का “देशमुखी ची संनद” कुणाकडे असावी या संबंधाने त्यांच्यात वाद होता .
हा तंटा चालू असताना निवाड्या पूर्वी अचानक आदिलशाही चे सरदार फत्तेखान याची स्वारी चालून आली
1648साली ही लढाई तीन टप्प्यात पार पडली ,
शिरवळ येथील भुईकोट किल्ला , त्या नंतर सासवड जवळील “बेलसर” गावी पडलेल्या फत्तेखान चे छावणी वरील हल्ला आणि त्या नंतर पुरंदर वरील लढाई .
“बेलसर “येथील छावणीवर हल्ला करण्याच्या मोहिमेची जबाबदारी महाराजांनी बाजी यांच्या वर सोपवली .
तेंव्हा बाजी यांनी महाराजांकडे अर्ज केला
“मजला बेलसर चे मोहिमेस महाराज रवाना करितात तेंव्हा साहेब कामावरी सेवक जावयास मागे सरतो ऐसे नाही , परंतु बाळाजी चां व माझा देशमुखी चां निवाडा आला नाही , इतका हेतू माझा राहतो ये विसी सेवकास आज्ञा काय?
तेंव्हा महाराजांनी आज्ञा केली की ,
“सांप्रत तुम्ही मोहिमेस जाणे , तुमचा सिक्का मजपाशी आहे, तुम्ही साहेच काम फत्ते करून सुरक्षित आलिया वरी तुमचा शिक्का बाळाजी पासून घेऊन तुम्हांस बहाल केला जाईल , ये वीसी फिकीर न करणे
कदाचित तुम्ही साहेब कामावर खर्च जाला तर शिक्का तुमचे गोरी वर ठेऊ हा निशा समजून तुम्ही खुशाल येसे जाणे .
या मोहिमेत बाजी पासलकर यांना वीरमरण आले , पण
छत्रपती यांनी दिलेला शब्द पाळून आजूबाजूच्या अनेक मात्तब्बर देशमुख घराण्याच्या समोर न्याय निवाडा करून बाजी पासलकर यांच्या घरान्या कडे ते अधिकार दिले .
भारतीय राज्य घटनेने अनु जाती वर्गातील लोकांच्या साठी प्रतिनिधित्व असावे म्हणून आरक्षणाची तरतूद केलेली असताना तिला डावलून त्या जागी सर्वा अधिक इतर जात वर्ग समूहाची घुसखोरी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस ने केली आहे .
सोलापूर जिल्ह्यातील राखीव जागेवर खऱ्या मागास वर्गीय लोकांना डावलून
कैकाडी(एन टी) मधील यशवंत माने यांना तर माळशिरस तालुक्यात ती धनगर नेते उत्तम राव जानकर यांना देण्यात आलेली आहे .
छत्रपती शिवराय यांचा असाच दुसरा एक निवाडा आहे .
छत्रपती शिवराय यांनी राज्याभिषेक केल्याने ते अधिकृत राजे झाले तर त्यांचे पुत्र संभाजी राजे हे युवराज म्हणून घोषित झाले .
छत्रपती संभाजी महाराज यांचे सासरे पिलाजी राव शिर्के हे चिंचवड चे मोरया गोसावी यांचे शिष्य .
तेथील देवस्थान साठी शिर्के यांच्या मध्यस्थीने उत्सव साजरा करण्यासाठी मोरया गोसावी यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्या कडून भात आणि मीठ घेण्याची सनद मिळवली .
त्यांना त्या प्रमाणे ती मिळकत होत राहिली , पण एकदा दुष्काळ पडला आणि गरीब शेतकऱ्यांना कमी उत्पादन झाले , त्या मुळे त्यांनी भात व मिठाचा खर्च देण्यास नकार दिला.
म्हणून मोरया गोसावी यांनी “सिंहगड” चे किल्लेदारास त्या शेतकऱ्यांना अटक करण्यास सांगितले .
छत्रपतींच्या जवळचे व्याही शिर्के , आणि युवराज संभाजी महाराज यांच्या सनद ने अधिकार प्राप्त झालेल्या मोरया गोसावी यांचा आदेश प्रमाण मानून किल्लेदार याने त्या शेतकऱ्यांना अटक करून कोठडीत टाकले.
शेतकऱ्यांचे नातेवाईक छत्रपती शिवराय यांच्या कडे कैफियत घेऊन गेले .तेंव्हा
छत्रपती नी तीन आज्ञा पत्रे लिहिली
किल्लेदार यास त्यांनी आज्ञा केली की , तुम्हास किल्लेदार आम्ही केले आहे , आमच्या आज्ञे शिवाय इतरांच्या आज्ञेचे पालन कराल तर त्याच अंधार कोठडीत तुम्हाला टाकू ,
त्या शेतकऱ्यांना तत्काळ मुक्त करून त्यांना सन्मानाने त्यांच्या घरी पोहोच करा .
दुसरे पत्र सचिवाला लिहिले
चिंचवड चे मोरया गोसावी यांच्या देवाचा उत्सव मोठा झाला पाहिजे , तो करण्याची जबाबदारी राजा म्हणून माझी आहे .
त्याचा खर्च माझ्या खाजगितून करावा .
त्याची तोशीस रयतेला लागता कामा नये
तिसरे पत्र त्यांनी मोरया गोसावी यांना लिहिले
“तुम्ही तर गोसावी , राज्य कारभाराची इतकी हाव कशासाठी? तशी हाव असेल तर तुमची वस्त्रे आम्हाला द्या व आमची वस्त्रे तुम्ही घ्या”
या उपर् राज्य कारभारात हस्तक्षेप कराल तर ” ब्राम्हण ” म्हणून मुलाहिजा ठेवणार नाही” हे ध्यानी धरा.
बोगस जात दाखले घेऊन राजकारण करणाऱ्याची इतकीच गरज राष्ट्रवादी काँग्रेस ला असेल तर त्यांनी त्यांना राष्ट्रवादी चे कोट्यातून विधान परिषद आमदार बनवून त्यांना थेट मंत्री किंवा पक्ष प्रमुख ही बनवावे
पण त्याची तोशीस खऱ्या मागास वर्गीय समाजाला लावू देऊ नये .
अश्या बनावट जात दाखला घेऊन राजकारणातील सत्ता भोगण्याची हाव इतकी असेल तर त्यांनी स्वतः ला
महार मांग म्हणून घोषित करावे आणि खुशाल या आरक्षित जागेवर आमदार व्हावे ,
आणि शेवटी एवढेच सांगतो की आत्ता तुमचे पुरोगामी पणाचे ढोंग बंद करा , आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुरोगामी म्हणून खूप प्रेम या पक्षावर केले , आयुष्याची अनेक वर्ष या पक्षासाठी घालवली , आत्ता तुमचा मुलाहिजा राखला जाणार नाही .
मी मागासवर्गीय समाजाला आवाहन करतो की सापाला मत द्या पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मत देऊ नका ,,,,,, “जय जिजाऊ , जय शिवराय, जय अहिल्या
जय भीम ,,, जय अण्णा भाऊ ,,,!”
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत