दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान

दिनविशेष – गुरुवार दिनांक 30 मे 2024

आज दि. ३० मे २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, गुरूवारो, वेसाख मासो, गुरूवार, वैशाख माहे.

३० मे १९२० – रोजी नागपूर येथे भारतीय बहिष्कृत वर्गाची पहिल्या अखिल भारतीय परिषदेचे अधिवेशन छ्त्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली भरले. या परिषदेला विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेसच्या वतीने अस्पृश्यांच्या प्रतिनिधींच्या नेमनुकिसंबंधी सरकारला दिलेले निवेदन अस्पृश्यांच्या हिताला बाधक असल्याचे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिंदेंच्या धोरणांचा विरोध करून तसा ठराव परिषदेत संमत करून घेतला.

३० मे १९३६ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत, मुंबईतील कामगार मैदान, परेल येथे मुंबई प्रांताच्या महार परिषदेचे अधिवेशन हैद्राबाद संस्थानातील प्रख्यात पुढारी श्री. बी. एस. व्यंकटराव उर्फ हैद्राबादी यांचे अध्यक्षतेखाली संप्पंन्न झाली.

३० मे १९३७ – रोजी स्वतंत्र मजूर पक्षाच्या आमदारांच्या अभिनंदनासाठी परळ कामगार मैदानावर सभा. यावेळी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांना भाषणातून म्हणाले की, “केवळ निवडणुकीत विजय मिळविल्याने चळवळीचे कार्य संपले असे समजू नका.”

३० मे १९५८ – रोजी सय्यद पिंपरी, जि. नाशिक येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते स्तूपाचे अनावरण.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!