१९९० च्या संसदेतील चर्चेसहित धर्मांतरित बौद्धांच्या सवलतीचा गंभीर प्रश्न या पुस्तकाच्या ४ या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ

दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह कामठी रोड नागपूर येथे पार पडला. समता प्रकाशन नागपूरचे प्रकाशक प्रदीप गायकवाड आणि समता सैनिक दलाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अध्यक्ष प्रो देविदास घोडेस्वार होते, प्रमुख अतिथी प्रा संजय अभ्यंकर, अड गुणरत्न रामटेके, अस्मिता अभ्यंकर व लेखक अनिल वैद्य आणि प्रकाशक प्रदीप गायकवाड . सूत्र संचालन शेखर गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाला प्रो डॉ केशव मेंढे आणि प्रो अशोक गाणार यवतमाळ,डॉ संजय भगत, भीमराव वाघमारे आणि इतर गणमान्य उपासक उपस्थित होते. सर्वांनी लेखक अनिल वैद्य आणि प्रकाशक प्रदीप गायकवाड यांचे अभिनंदन केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत