माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात मागील काही आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना निमोनियाने ग्रासले होते त्यातच त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. बबनराव ढाकणे यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी गुरुवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.
ढाकणे यांचं पार्थिव आज पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपरी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव याव येथे अंत्यसंस्कार केले जातील.
संघर्ष योद्धा नावाने ओळखले जाणारे ढाकणे यांनी पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा राजकीय प्रवास रेला. बबनराव ढाकणे चार वेळेस आमदार आणि खासदार म्हणून ते लोकसभेवर निवडूनही गेले होते. राज्यात बांधकाम विभाग, ग्रामविकास विभागाचे मंत्रिपदही त्यांनी भूषवले होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात ते राज्यमंत्री होते. जनता दल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांतही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत