पंढरपुरात नेत्यांच्या गाड्या अडवल्या; आमदार शिंदेंच्या विरोधात आंदोलन.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात येथील सरगम चौकात आंदोलन केले. राजकीय नेत्यांना पंढरपुरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी यांचा ताफा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आडवला.
भाजप आमदार समाधान आवताडे यांचाही गाडी अडवून आरक्षणाची मागणी केली. मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनामुळे आज दिवसभर शहरात तणावाचे वातावरण होते. बुधवारपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पंढरपूर शहर व तालुक्यात साखळी उपोषण सुरू केले आहे.
सुमारे ४० हून अधिक गावांनी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. आज सकाळी आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी विठ्ठल दर्शनासाठी आल्याचे समजाताच मराठा समाजाच्या तरुणांनी मंदिराजवळ नारायण स्वामी यांची गाडी अडवून त्यांच्या समोरच आरक्षण मागणीच्या घोषणा दिल्या.
मराठा समाजबांधव आक्रमक झाल्याचे पाहताच पोलिसांनी नारायण स्वामींना अन्य मार्गाने बाहेर नेले. खर्डी येथील मराठा समाजाने आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान न करण्याची शपथ घेतली आहे.
तर कौठाळी येथे मराठा समाजाच्या तरुणांनी गावातून कॅंडल मार्च काढला. आज शेगाव दुमालाव पळशी येथील ग्रामस्थांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केल्याचा ठराव मंजूर केला. येथील मराठा बांधवांनी तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांना आरक्षण मागणीचे निवेदन दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत