धर्मांतरामुळे बौध्द समाजात झालेले परिवर्तन …
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांमधील असहाय्यतेची, निराधार पणाची, भावना नष्ट करून स्वाभिमान जागृत करून दलित बांधवांना संघटितपणे एकत्र आणण्याचे काम केले. त्यामुळे हिंदू समाज व्यवस्थेविरुद्ध क्रांतीची सूरही त्यांच्या विचारांमध्ये उठायला लागला, जो धर्म दलित बांधवांना माणूस म्हणून योग्य स्थान देईल तो धर्म दलित बांधवांनी स्विकारावा हा विचार त्यांनी मांडला.
सन १९२४ ला बहिष्कृत परिषदेत बोलताना बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, सर्वच लोकांना देशांतर करणे शक्य होणार नाही तेव्हा देशात राहून अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्याचा मार्ग शोधून काढला पाहिजे अशा प्रकारचा दुसरा मार्ग म्हणजे धर्मांतर आहे.
१३ ऑक्टोबर १९३५ नाशिक जिल्हा येवला येथे धर्मांतर करणार अशी घोषणा केली. धर्मांतर करणार या घोषणेने देशात फार मोठी खळबळ माजली. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला धर्म स्वीकारावे यासाठी वेगवेगळ्या धर्माचे प्रमुख प्रयत्न करू लागले.
२७ ऑक्टोबर १९३५ रोजी बौध्द धर्मीय प्राध्यापक धर्मानंद कोसंबी हे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटले. आणि वाराणसी येथील महाबोधी सोसायटीचे वाली सिंह यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याची विनंती केली.
१६ ऑक्टोबर १९३५ रोजी अमृतसर सुवर्णमंदिराचे उपाध्यक्ष सरदार दरीप सिंह ठोबिया यांनी तार पाठवून शीख धर्म स्वीकारण्याची विनंती केली. मुस्लिम धर्मीय हैदराबादचे निजाम व फत्तेपूर गुलबर्गाचे निजाम यांनी काही कोटी रुपये देऊ केले होते परंतु बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारले. २५ ऑक्टोबर १९३५ रोजी राजगृह, मुंबई येथे डॉ. एम. बी. वेलणकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंचे शिष्टमंडळ भेटले. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराच्या घोषणेमुळे महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी काँग्रेसचे बडे नेते नाराज झाले होते. परंतु निश्चयापासून ढळले नाहीत.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्वांचा पुरस्कार करणारा बुद्ध धम्म जवळचा वाटला व त्याचा स्वीकार करून संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न मनात बाळगले १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोका विजया दशमीला नागपूर येथे महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून स्वतः व अनुयायांना बावीस प्रतिज्ञा पहिल्या देऊन बौध्द धम्माची दीक्षा घेतली.
१) धर्मांतरामुळे झालेले पहिले परिवर्तन, समाजात मानसिक परिवर्तन झाले, आम्ही गुलाम नाही, अस्पृश्य नाही, दलित नाही, आम्ही बौध्द आहोत ही मानसिकता निर्माण झाली.
२) धर्मांतरामुळे झालेले दुसरे परिवर्तन, समाज अंधश्रद्धेतून मुक्त झाला. कारण त्यांनी बावीस प्रतिज्ञा अनुसरण केल्या आहेत. देव देवता नाकारल्या, पूजा कर्मकांड, उपासतापास नाकारले, देवाला नवस करणे, बळी देणे बंद केले.
३) धर्मांतरामुळे झालेले तिसरे परिवर्तन, मृत जनावरे खाणे, ओढणे सोडले. उष्टे अन्न खाणे सोडले, राहणीमान सुधारले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, खेडी सोडा शहराकडे चला या आदेशाप्रमाणे आम्ही शहराकडे वाटचाल केली त्यामुळे उत्पन्नाचे नवे मार्ग सापडले.
४) धर्मांतरामुळे झालेले चौथे परिवर्तन, वस्त्यांचे नामांतर भिमनगर, गौतम नगर, फुले नगर, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, शाहूनगर असे परिवर्तन झाले.
५) धर्मांतरामुळे झालेले पाचवे परिवर्तन, मुला मुलींची नावे बौद्ध धम्माप्रमाणे ठेवू लागले. सिद्धार्थ, गौतम, धम्मदीप, धम्मपाल, प्रशिक, प्रज्ञा, शील, करुणा हे परिवर्तन झाले.
६) धर्मांतरामुळे झालेले सहावे परिवर्तन, बुद्ध जयंती, भिमजयंती, धम्मचक्रप्रवर्तन दिन, बारा पौर्णिमा, अमावास्या, अष्टमी असे आमचे मंगल दिन धर्मांतरामुळे साजरे होऊ लागले.
७) धर्मांतरामुळे झालेले सातवे परिवर्तन, बुद्धगया, लिंबूनी, कपिलवस्तु, श्रावस्ती, कुशीनगर, महू, अंबावडे, वनंद, महाड, दीक्षाभूमी, चैत्यभूमी, अजिंठा वेरूळ, कान्हेरी गुंफा अशी आमची पवित्र स्थळे पाहू लागलो.
८) धर्मांतरामुळे झालेले आठवे परिवर्तन, आजच्या संस्कार विधीत परिवर्तन झाले, नामकरण, धम्मदीक्षा, साक्षगंध, विवाह विधी, पुण्यानुमोदन विधी बौध्दाचार्य, भंन्तेजी करू लागले.
९) धर्मांतरामुळे झालेले नववे परिवर्तन, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका हा संदेश दिला त्याप्रमाणे आम्हाला शिक्षणाची ओढ लागली, आमची मुले डॉक्टर, वकील, प्रोफेसर, इंजिनियर, अधिकारी, डायरेक्टर, मॅनेजर, कारखान्याचे संचालक, सुपरवायझर झाले असे शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन झाले.
१०) धर्मांतरामुळे झालेले दहावे परिवर्तन, प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे, दिवंगत नामदेव ढसाळ, आद. ज. वि. पवार असे अनेक साहित्यिक तयार झाले.
भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय पदाधिकारी आद. एम. डी. सरोदे, आद. बि. के. आहिरे, आद. एस. के. भंडारे, आद. बि. एच. गायकवाड, आद. सुषमाताई पवार यांनी पुस्तके लिहून धार्मिक आणि साहित्य क्षेत्रात पाऊल टाकले.
११) धर्मांतरामुळे झालेले अकरावे परिवर्तन, गावागावात बुद्ध विहारे निर्माण झाली तिथे वंदना, प्रवचने, वर्षावास कार्यक्रम, संस्थेची शिबीरे, तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन चालू झाले त्यामुळे बौद्ध धर्माची तत्व प्रणाली समजू लागली.
१२) धर्मांतरामुळे झालेले बारावे परिवर्तन, महिलांनी शिक्षणात प्रगती केली, नोकरी करू लागल्या, साहित्य क्षेत्रात पाऊल टाकले. उच्चशिक्षित महिला शिक्षिका, प्रोफेसर, डॉक्टर, वकील, बिझनेस मॅन झाल्या. काही महिला राजकारणात उतरल्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार मंत्री पदी विराजमान झाल्या आहेत. राष्ट्रीय खेळामध्ये प्रगती केली हे सारे धर्मांतरामुळे परिवर्तन झाले.
समाजातील महिलांची धार्मिक प्रगती झाली, महिला धम्म प्रशिक्षण, शिबिरात भाग घेऊ लागल्या, प्रवचन, वंदना, सूत्र काम करू लागल्या. धम्म प्रवचन देऊ लागल्या.
१३) धर्मांतरामुळे झालेले तेरावे परिवर्तन, घरामध्ये तथागत बुद्ध, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, माता रमाई, माता सावित्रीबाई यांच्यासारख्या महापुरुषांच्या प्रतिमा भिंतीवर आल्या. घरात त्रिसरण, पंचशिलेचे सूर घुमू लागले हे सारे धर्मांतरामुळे झाले.
67 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
नमोबुद्धाय ! सविनय जयभिम !!
आपला धम्मबंधू
आयु. राज जाधव ✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत
खूप छान विशेषांक ????????
अतिशय महत्वाची माहिती एकाच ठिकाणी मिळाली.
टीम जागृत भारत.com चे मनपूर्वक आभार ????????????
thank you sir