नवजात शिशू कक्षात २० महिन्यांत ४३६ शिशू मृत्यू, शासकीय सामान्य रुग्णालयात असुविधांचा डोंगर.
चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रूग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षात २०२२-२३ या वर्षी २९८ तर १ एप्रिल २०२३ ते १ ऑक्टोंबर २०२३ या आठ महिन्यांत १३८ नवजात शिशूंचा मृत्यू झाला आहे. २० महिन्यांत ४३६ नवजात शिशूंचा मृत्यू झाला आहे. अवघे २४ बेड असलेल्या या अतिदक्षता कक्षात दररोज ४० ते ५० पेक्षा अधिक नवजात शिशू असतात. विशेष म्हणजे शिशूंचा मृत्यूचा आकडा कमी दिसावा यासाठी शिशूंची संख्याही अधिक दाखविली जात असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.
नांदेड व नागपूर येथे शासकीय वैद्यक महाविद्यालयात चोवीस तासांत २४ नवजात बालकांच्या मृत्यूने राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रूग्णालयाचा फेरफटका मारला असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शासकीय वैद्यक महाविद्यालयात नवजात शिशू अतिदक्षता कक्ष आहे. या कक्षात नवजात शिशूवर उपचार केले जातात. गेल्या २० महिन्यांचा आढावा घेतला असता एकूण ४३६ नवजात शिशूंचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या एक वर्षात २९८ नवजात शिशूंचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. तर १ एप्रिल २०२३ ते १ ऑक्टोंबर २०२३ या काळात १३८ नवजात शिशूंचा मृत्यू झालेला आहे. या कक्षामध्ये असंख्य असुविधा आहे. एकूण २४ बेडचे नवजात शिशू अतिदक्षता कक्ष आहे. मात्र या कक्षात दररोज ४० ते ५० पेक्षा अधिक नवजात शिशूंना उपचारार्थ ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत