वडील गेले, आईने दुसरं लग्न केलं; अकरा वर्षांच्या मुलाने आश्रमशाळेतच मृत्यूला कवटाळलं.

अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक निवासी आश्रमशाळेत असलेल्या अनिल कोमशा पाडवी या पाचवीतील साडेअकरा वर्षीय विद्यार्थ्याने शाळेतील शौचालयाजवळ गळफास घेतल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली.
शौचालयासाठी जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने तातडीने त्यांनी आश्रम शाळेच्या अधीक्षकास सांगितले. तशाच अवस्थेत या विद्यार्थ्याला रुग्णालयात घेऊन जात असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल पाडवी (रा. त्रिशूल, ता. धडगाव, जि. नंदुरबार) येथील हा विद्यार्थी गेल्या वर्षी चौथीपासून या शाळेत होता. त्याची सावत्र बहीणदेखील याच शाळेत पाचवीत आहे.
अनिल पाचवी तुकडी ‘ब’ मध्ये होता. काल सायंकाळी पाचच्या सुमारास इमारतीच्या खाली मैदानावर मुलासोबत तो होता. जेवणानंतर दुसऱ्या मजल्यावर त्याच खोलीवर गेला. मात्र, रात्रीच्या सुमारास खाली शौचालयाजवळ लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे काही विद्यार्थ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने तातडीने अधीक्षक समुवेल गावित यांना सांगितले.
तशाच अवस्थेत रुग्णालयात घेऊन जात असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अनपेक्षित घडलेल्या घटनेमुळे आश्रमशाळेत शोककळा पसरली. मयत अनिल पाडवी याचे वडील कोमशा पाडवी यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्याच्या आईने दुसरे लग्न केल्याने ती देखील त्यांना सोडून निघून गेली आहे. अनिल पाडवी याला एक लहान बहिण असून तीसुध्दा आमळी येथील कर्म. बापूसाहेब डि.के.अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती स्थानिकांनी यावेळी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत