आर्थिकविदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधी तंबाखू व दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी ; ९ लाखाचा माल जप्त.

जिल्ह्यात सुगंधी तंबाखू व दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. अवैध सुगंधी तंबाखु तस्करी करतांना ९ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. तर पांढऱ्या गोणीत ३० दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या.

बल्लारपूर येथे एक कोटींचा सुगंधीत तंबाखू पकडल्याचे प्रकरण ताजे असतांनाच दुर्गापूर येथे ९ लाखाचा अवैध सुगंधी तंबाखू पकडला आहे. चंद्रपुर जिल्ह्यात वाहतूक पोलिसांनी ९ लाख रूपयांचा अवैध सुंगधित तंबाखु जप्त केला आहे. या कारवाईमध्ये दोघांना अटक केली आहे. दुर्गापूरकडून चंद्रपुरात येणाऱ्या एका वाहनामध्ये नाका बंदी चौकशी दरम्यान सापडला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर जाधव, संदीप जाधव यांनी कारवाई केली. मध्यरात्री झालेल्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणाले आहेत.

याप्रकरणाचा अधिक तपास रामनगर पोलिस करत आहेत. बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी दारूच्या ३० बॉटल पकडल्या आहेत. काझीपेठ जिल्हा हनवाकोंडा तेलंगणा येथील कपाट येथे आरपीएफ व जीआरपी यांनी संयुक्त झडती घेतली असता पांढऱ्या गोणीत ३० दारूच्या बाटल्या आढळून आल्याने जीआरपी बल्लारशाह यांनी आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई केली, त्यामध्ये विदेशी दारूच्या ३० बॉटल्स आढळून आल्या. त्याची किंमत १३ हजार २०० रुपये आहे. पुढील कारवाई जीआरपी बल्लारशाह पोलीस करत आहेत. ही कारवाई आरपीएफ बल्लारशाहचे पोलीस निरीक्षक पाठक यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक मंगेश पायघन, कॉन्स्टेबल ललित कुमार यांच्या सुचनेनुसार नागपूरचे एएसआय बघेल, रवींद्र खंडारे व जीआरपीचे नीलेश यांच्या सुचनेवरून करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!