लोकल ट्रेन बफरला तोडून फलाटावर गेल्याचा अपघात

मथुरा जंक्शन येथे मंगळवारी रात्री लोकल ट्रेन बफरला तोडून फलाटावर गेल्याचा अपघात घडला होता. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून मद्यधुंद रेल्वे स्टाफने मोबाईल पहाण्याच्या नादात हा अपघात केल्याचे उघड झाले आहे.
उत्तरप्रदेशातील मथुरा येथे मंगळवारी लोकल बफर डेड एण्ड तोडून फलाटावर घुसल्याचा धक्कादायक अपघात घडला होता. या प्रकरणाच्या तपास करण्यात आला असून संयुक्त तपासात रेल्वेचा स्टाफ मद्यधुंद अवस्थेत मोबाईलवर व्हिडीओ कॉल करण्यात बिझी असल्याने हा अपघात घडल्याचे उघडकली आले आहे. या प्रकरणातील या रेल्वे स्टाफचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या प्रकरणात मद्यधुंद स्टाफसह पाच जणांना सस्पेंड केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत