दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

स्वाधार’ शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कडून समाज कल्याण आयुक्तांना निवेदन सादर.

वंचित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या वंचित बहुजन युवा आघाडी – प्रदेश कमिटी, महाराष्ट्र राज्य कडून आज समाज कल्याण आयुक्त पुणे ह्यांना निवेदन करण्यात आले असून, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता समाजकल्याण विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती योजनेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख १० जून २०२५ निश्चित करण्यात आली होती.मात्र, शेवटच्या टप्प्यात हजारो विद्यार्थ्यांना पोर्टलवरील तांत्रिक अडचणी, OTP त्रुटी, साईट हैंग होणे या कारणांमुळे अर्ज सादर करता आले नाही. यामुळे सुमारे ३५०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.असल्याने मुदत वाढ तसेच ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर पावसाचे वातावरण आहे. परिणामी, ग्रामीण व आदिवासी भागात अनेक ठिकाणी विद्युतपुरवठा अकार्यक्षम आहे किंवा सतत खंडित होत आहे, याचा थेट फटका ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला बसत आहे. या पार्श्वभूमीवर, अंतिम तारीख १० जून असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा प्राप्त होऊ शकल्या नाहीत.

त्यामुळे, दिनांक २३ जून २०२५ पासून पुढे प्रशासकीय स्तरावर तातडीने निर्णय घेऊन, किमान १५ दिवसांची मुदतवाढ म्हणजेच ८ जुलै २०२५ पर्यंत देण्यात यावी, किंवा या उर्वरित विद्यार्थ्यांचे ऑफलाइन अर्ज स्वीकारून त्यांनाही स्वाधार योजनेचा लाभ देण्याकरिता समावेश करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही मुदतवाढ दिल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्ज करताना पुन्हा तांत्रिक अडथळे येऊ नयेत, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या आयटी शाखेने सर्व्हरची कार्यक्षमता, OTP प्रणाली, पोर्टलची सुस्पष्टता यासंदर्भातील जबाबदारी तंतोतंत पार पाडावी. हा विश्वास विद्यार्थ्यांना आणि संस्थांना देणे गरजेचे असल्याचे युवा आघाडीचे वतीने स्पष्ट करण्यात आले.ह्या बाबत सोमवारी सकारात्मक निर्णय होण्याचा विश्वास युवा आघाडीचे वतीने प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, तसेच प्रदेश सदस्य अमित भुईगळ, प्रदेश युवा पदाधिकारी ऋषिकेश नांगरे पाटील, एड. अफरोज मुल्ला, विशाल गवळी यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!