योगदिन -भांडवलशाहीचे प्रतीक

प्रा अनिल भालेराव
गेल्या काही दिवसापासून योगाचे फॅड वाढत आहे. योगाचे नावाने चमत्कारी गोष्टी सांगितल्या जातात. पण मला आमचा शेतकरी, कामगार मात्र याला कधीच योगाची गरज पडली नाही. योग शिकायचा असेल डोंबरी बांधवाकडून शिकावा, त्याचप्रमाणे सर्कशीत काम करणाऱ्या कलाकाराकडून शिकावा. योग दिनाच्या निमित्ताने ढेरपोटे आमदार, खासदार राजकारणी,उदयोजक,उच्चभ्रू स्त्रिया हेच जास्त योगा करताना दिसतात, तरीही योगानुसार त्यांना आध्यत्मिक शांती मिळायला पाहिजे होती, उलट त्यांची सत्ता आणि पैसा याची हाव वाढत योग सांगणाऱ्या गुरूने तर धंदा सुरु करत हिंदूंतील मागासाच्या (आदिवासी आणि भटके, obc) जमीनी बळकावत त्यांना अफूची गोळी देत मोक्षाचे आमिष दाखविले जात आहे. योगदिनानिमित्त येणारा खर्च हा काही कोटीपर्यंत येत असून शासनाकडे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी पैसा नाही. पण धर्माची आणि संस्कृतीची अफू पाजण्यासाठी वारेमाप पैसा आहे. यामध्ये राजकारणी आणि उदयोजक यांची युती असून लोकांना मूर्ख बनविले जात आहे. अशा या अतिधार्मिकतेमुळेच आणि धर्मातील जातीभेदामुळे देश परकीय सत्तेच्या अधीन केल्या गेला. आज जगात AI सारखं technology वापरत मोठ्या आर्थिकसत्ता अधिक श्रीमंत होत जग कल्याण साधत आहे. बाजारपेठ निर्माण करत आहे. आम्ही भारतीय फेसबुक आणि व्हाट्सअप वापरत अधिक अधिक पैसा हा परकीय राष्ट्राना देत आहे. जर उत्सव साजरे करायचे असतील विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये स्वदेशी वैज्ञानिक यात्रा भरवून साजरे केले पाहिजे.असो. सर्वांचे मंगल होवो. जय भारत
@अनिल भालेराव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत