” आईचा महिमा,त्याला शब्दांचा तुटवडा.!”

आई ती आईच असते,
घराशिवाय तिला,
कुणाशीच देणंघेणं नसते,
संसाराच्या जंजाळात,
कायम भिरभिरताना दिसते,
कामात कसूर होऊ नये,
म्हणुन कायम सावधगिरी बाळगते!
आई ती आईच असते,
नऊ मास उदरात,
स्वताची अंतर ऊर्जा देऊन,
पालन पोषण करीत,
जिवापाड जपते,
बालकाच्या जन्माने, स्वर्ग सुखाचा आनंद घेते,
तिच्यात जग, सामावलेले दिसते,
हृदयात साठवणारे तिच्यापरी,
भूतलावर कुणीच नसते.!
आई ती आईच असते,
चुकीला दुर्लक्षणारी अन रागात धपाटा घालताना, तीच दिसते,
तिच्या शिव्या, शापातही कळवळीची ऊब भासते,
अन काळजात साठवणारी,
माय माऊली, ती एकटीच असते.!
विसरते, दिन रात,
अथवा थकवा असो भरमसाट,
जीव घुटमळत राही,
बाळाच्या काळजीत,
रडता बाळ, उठून बसे जिवाच्या आकांताने,
ती सर्वांत उशिरा झोपते,
अन सकाळी पहिल्यांदा अंथरुण सोडते,.!
आई ती, आईच असते,
घराचा ती, कणा असते,,
सदैव चालणारा, घाणा असते,
तिला विश्रांती, ठाऊक नसते,
तिच्यामुळे घराला, घरपण येते, सगळ्यांच्या जगण्याला, अर्थ देते.!
जग रहाटी कुणाला ना टळे,
जराजर्जर अवस्थेत,
तिची आई बना, जशी ती होती,
काळजीवाहू बना, जशी तिने बालपणी घेतली,
तिला आनंदी ठेवा, जसा बालपणी
आनंदासाठी तिने जीव टाकला,
तिला सुखात, समाधानात, आनंदात ठेवले तर,
तीर्थक्षेत्री जाऊ नका,
देवळात माथा टेकू नका,
तर देवच तुमच्या घरी येतील अन
घर तुमचे, तीर्थक्षेत्र होईल.!
घर तुमचे, तीर्थक्षेत्र होईल.!!
घर तुमचे, तीर्थक्षेत्र होईल.!!!
अरुण निकम.
9323349487.
मुंबई.
दिनांक…09/06/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत