एकदा ही आमच्या समाजाची आठवण तुम्हाला का नाही ?

ऍड अविनाश टी काले
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे प्राण पणाला लाऊन मागासवर्गीय आणि आदिवासी समाजासाठी कायदे मंडळात व विधान सभेत राखीव जागा निर्माण केल्या , या वर्गाचे स्वतंत्र मतदार संघ असावेत अशी मागणी त्यांनी केली .
परंतु समाजात कायमचे दुभंगलेपण निर्माण होईल म्हणून महात्मा गांधी यांनी येरवडा येथे प्रदीर्घ उपोषण केले
आणि पुणे करारा मुळे संयुक्त मतदार संघ निर्माण झाले .
सवर्ण उमेदवार निवडून देताना दलीत आदिवासी यांची ही मते लागतात .
त्याच प्रमाणे दलीत , आदिवासी लोकप्रतिनिधी निवडला जात असताना सवर्ण मतदार ही लागतात .
यातून एक समंजस समाज निर्मिती अपेक्षित असताना , कांहीं लोक मागास जाती चे साधर्म्य असलेले जात दाखले बनवून घेतात .
प्रत्यक्ष त्या भागातील लोक जाणतात की तो व्यक्ती मागास वर्गीय नाही .
परंतु स्वतःचे आर्थिक लाभा ने प्रेरित झालेले लोक व छोटी सत्ता याचे आमिषाने त्या व्यक्तीचे समर्थक बनातात , तर त्यांच्या जातीचे लोक आपल्या समाजाचा नेता लोकप्रतिनिधी बनतो म्हणून स्वार्थाने प्रेरित होऊन , जात प्रेमाने अंध बनून त्यांचे समर्थन करतात .
पण हे लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाच्या लढाईचा अपमान करतात .
आणि आर्थिक , सामजिक , राजकीय दृष्ट्या मागास वर्गियांचा हक्क हिरावून घेऊन त्यांचे ताट बळजबरीने गठ्ठा आणि आर्थिक ताकदीच्या आधारे हिसकावून घेतात .
हा प्रकार अनुचित असून यात प्रस्थापित पक्ष जे स्वतः ला फुले शाहू आंबेडकर वादी म्हणवून घेतात ते ही पुढे आहेत
नवनीत राणा किंवा उत्तम राव जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस ने उमेदवारी दिली होती हा इतिहास आहे ,
त्याच प्रमाणे भाजप ने ही लोकसभेला जय सिध्देश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली होती .
प्रस्थापित घराणी ही अश्या उमेदवारी चे समर्थन करत असतील तर ही बाब दुर्दैवी आहे .
त्यांची सत्ता यावी म्हणून मागास वर्गीय समाजाने आपली मते इतरत्र न वळवता त्यांना दिली आहेत , आणि आरक्षण कालखंड संपल्या नंतर त्या जागा ओपन होणार आहेत .
तेंव्हा दालिता मधील नवबौध्द व मातंग समाज याची आवश्यकता त्यांना निवडून येण्यासाठी लागणारच आहे .
25 वर्षाच्या टर्म मध्ये एकदा ही आमच्या समाजाची आठवण तुम्हाला झाली नाही का? या प्रश्नाचे उतर त्यांच्या कडे सकारात्मक असेल की नकारात्मक ? यावरच त्यांचे प्रदीर्घ राजकारण टिकणार आहे .
माळशिरस तालुक्या पुरते बोलायचे झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तमराव जानकर यांना आमदार बनवण्याचा दिलेला शब्द विधान परिषद देऊन पूर्ण करावा .
पण त्यांनी मागास वर्गीय जागेवर उमेदवारी दिली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ला दलितांचे शत्रू म्हणून घोषित करू ,,, लवकरच समग्र महाराष्ट्रातून आम्ही जागृती मार्च काढत आहोत , त्याचे मार्ग ठरवणे , आर्थिक नियोजन , अश्या सर्व बाबीचे नियोजन चालू आहे , ज्यात मायक्रो ओबीसी पासून एस सी , एस टी , एन टी , भटके विमुक्त , वडार , पाथरवट , घडसी अश्या सह मुस्लिम ओबीसी चे नेते ही असणार आहेत ,
आत्ता सगळे समाज जागृत झालेले आहेत ,
ही लढाई व्यक्ती द्वेषाची , व्यक्ती प्रेमाची नाही तर हक्क आणि अधिकाराची आहे , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकाराचे जतन करणे हे आमचे कर्तव्य आहे .
दलितां मधील सर्वात मोठ्या जाती नवबौध्द व मातंग समाजाला डावलून होणाऱ्या भेदा भेद विरोधात ही लढाई आहे हे सर्वच पक्षांनी लक्षात ठेवावे
आपला
ऍड अविनाश टी काले
अकलूज
9960178213
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत