मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

नळदुर्ग येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत स्वयं शासन दिन साजरा.

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग येथे जिल्हा परिषद कन्या प्रशालेत स्वयं शासन दिन खुप मोठ्या उत्साहात व एक दिवसाची शिक्षिका म्हणून आनंद घेत साजरा करण्यात आला.
“हा निरोप नव्हे हा तर माणुसकीचा ओलावा आहे, विसरू कसे आम्ही आदर्श गुरुजनांचा” असे म्हणत विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन खूप मोठ्या पद्धतीने चांगला साजरा केला. या स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका म्हणून प्रबोधिनी दादासाहेब बनसोडे यांनी काम पाहिले तर उप मुख्याध्यापिका म्हणून अनुष्का गायकवाड यांनी काम पाहिले त्यानंतर नळदुर्ग येथील नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे, पत्रकार दादासाहेब बनसोडे, पत्रकार मित्र अमर भाळे आदिंच्या हस्ते मुख्याध्यापिका प्रबोधिनी बनसोडे उप मुख्याध्यापिका अनुष्का गायकवाड यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
प्रथमता क्रांतीज्योती भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले व भारताचे पहिले नोबल पुरस्कार विजेता चंद्रशेखर रमण यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर इयत्ता नववीच्या मुलीनी इयत्ता दहावीच्या मुलींना आनंदाचे अश्रू गाळत शाळेचा निरोप दिला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वयंशासन दिन साजरा केला जातो या स्वयंशासन दिनाचे औचित्य साधून ज्या शिक्षकाकडून आपण घडलो त्या शिक्षकांचा आदर्श डोळ्या समोर ठेवत गुरुजनांकडुन जे शिकलो भविष्यात त्याच आदराने आम्ही चालू असे सांगत सर्व मुलीने एकमेकांना गळा भेट घेतल्या एकमेकाना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका प्रबोधिनी दादासाहेब बनसोडे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे सर्व शिक्षक होते कार्यक्रम प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड यांनी केले तर यावेळी सहशिक्षक मिलिंद कुलकर्णी , केंद्रप्रमुख सत्येश्वर जाधव, दत्तात्रय सगर, निर्मला गावित, लीलावती कौरव, हारूण अत्तार, अश्विनी साळुंखे, आदींनी आपापले मनोगत व्यक्त केले.

सर्वच शिक्षक व शिक्षिकानी विद्यार्थाचे मन भरून कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निशा जाधव आणि प्रतीक्षा मुळे यांनी मानले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!