डॉ ईस्माईल मुल्ला यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल जिल्हाधिकारी यानी केला सन्मान

राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत केला सन्मान
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
धाराशिव जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अभियाना अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण
कार्यक्रम धाराशिव यांच्या मार्फत जिल्हाभरात ” होय आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो ” प्रतिज्ञा करा , तरतुद करा , सेवा द्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत २०२४ मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या जागतिक क्षेयरोग दिना निमीत्त
नळदुर्ग येथील उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ईस्माईल मुल्ला यांना धाराशिव जिल्हयाचे जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार व धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्या हस्ते सन्मानपत्र पत्र देऊन गौरविण्यात आले .
डॉ ईस्माईल मुल्ला हे नळदुर्ग येथील उप जिल्हा रुग्णालयाचे काम चालू झाल्या पासून ते आज तागायात खुप चांगली सेवा व आध्यात्मिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम प्रामाणिक पणे पार पडले आहेत , उप जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापन तेथील कामाची जबाबदारी संपूर्णपणे स्विकारून ते आज ही पार पाडत आहेत या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन राष्ट्रीय क्षयरोग दिनाचे औचित्य साधून त्यांचा गौरव करण्यात आला .त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत