मुख्य पान

भाजपची ओरिजनल बी टीम काँग्रेस मध्ये

भाजपची ओरिजनल बी टीम काँग्रेस मध्ये, दिल्लीत आपला साफ करून भाजप निवडून आणल्यावर राहुल गांधींना साक्षात्कार !

काँग्रेस मध्ये राहून भाजपचे स्लीपर सेल म्हणून काम करणारे काँग्रेस नेत्यांना बाहेरची वाट दाखविण्याचे वक्तव्य राहुल गांधींनी गुजरात मध्ये केले आहे.दिल्लीत भाजप विरोधात असलेले आपचे सरकार पडून तिकडे भाजप निवडून आणल्यावर राहुल गांधींना आपल्या पक्षात भाजपचे स्लीपर सेल असल्याचा साक्षात्कार होणे ही दुटप्पी भूमिका असून अनेक राज्यात भाजपचे काँग्रेस चालवत असताना इतक्या उशिरा काँग्रेसला शहाणपण सुचले असून महाराष्ट्र सहित अनेक राज्यात मोठी सफाई मोहीम काँग्रेसला राबवली तर ६०% काँग्रेसी काढावे लागतील अशी टीका वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
अनेक राज्यात भाजपचे स्लीपर सेल काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेत असून भाजपचे बी टीम म्हणून काम करतात हेच तर आम्ही सांगत होतो.भाजपची ओरिजनल बी टीम काँग्रेस आहे.अनेक जिल्ह्यात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सेना ह्यांना पदाधिकारी पुरवतात.एवढच कशाला २०१४ ते २०१७ भाजप खासदार राहिलेला नाना पटोले प्रदेशअध्यक्ष बनविण्यात आला, त्या आधी विधान सभा अध्यक्ष बनला त्यांनी कुणालाही न सांगता थेट राजीनामा दिला त्यामुळे सेना राष्ट्रवादी फुटली मात्र सभापती पद सोडल्याने सर्व निर्णय घेण्याची मुभा नार्वेकर ह्याला मिळाली आणि राज्यातील मविआ सरकार अरबी समुद्रात बुडाले.नाना पटोले च्या काळात तीन निवडणुक झाल्यात त्यात एक राज्यसभा आणि दोन विधान परिषद तिन्ही निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी थेट भाजपला मतदान केले.मात्र भाजपला मतदान करणारे आमदार ह्यांच्या वर कुठलीही कार्यवाही झाली नाही किंवा त्यांची नावे देखील बाहेर आली नाही.असे अनेक नाना पटोले काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेत आहेत.
राहुल गांधींना गुजरात मध्ये गेल्यावर ह्याची माहिती मिळाली असेल तर अजूनही त्यांना पूर्ण काँग्रेसची खरी ओळख पटली नाही असे दिसते.मात्र दिल्लीत इंडीया आघाडीच्या ‘आप’ ला पराभूत करून भाजप निवडणुन आणण्याचे काम काँग्रेस कडून झाले ते काय होते ह्याचा खुलासा देखील राहुल गांधींनी केला पाहिजे, असे आवाहन देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केले आहे…

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!