दिन विशेषमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मिडीयम स्कुलचे वार्षिक स्नेह संम्मेलन उत्सहात संपन्न

चिमुकल्यानी पालकांची मने जिंकली , आणि पालकांनी मनमुराद आनंद लुटला

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक स्नेह सम्मेलन संपन्न झाला यामध्ये U K G व L K G च्या विद्यार्थीनींनी व विद्यार्थी यांनी रसिकांची मने जिंकली खुप चांगले अभियन केले आणि डान्सची धूम ठोकली
पालकांनी मनमुराद आनंद लुटला
प्रथमता रयतेचे राजे बहुजन प्रतीपालक छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्य प्रतिमेच पुजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन डॉ स्नेहा सुरवसे यांच्या हस्ते फित सोडुन झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका कविता पाटील ह्या होत्या प्रमुख पाहुणे डॉ यशवंत नरवडे , चिकुंद्रा गावचे माजी सरपंच राजेंद्र गरड , अशोकराव केसकर , शुभांगी गायकवाड तर सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीरा वऱ्हाडे जेष्ठ पत्रकार विलास येडगे , बंडु कसेकर , अदिजन उपस्थित होते
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मारुती खारवे यांनी केले
आलेल्या सर्व पाहुण्याचे स्वागत पर सत्कार डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक तथा मुख्य प्रवर्तक मारुती खारवे यांनी केले .
विद्यार्थांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून स्पेशल हा विविध गुण दर्शनच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या स्नेह सम्मेलनात मराठी हिंदी कोळीगीत , लोकगीत , लावणी , भक्तीगीत , भावगीत , भिमगीत चित्रपटगीत , बालगीत देशभक्ती पर गाण्यावर आगदी सुंदर नृत्य सादरीकरण करत चिमुकल्यांनी पालकांची मने जिंकली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक जनक गायकवाड यांच्या सह इयत्ता नववीतील विद्यार्थीनी समिक्षा चव्हाण व नगमा काझी यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!