मनुष्यास सर्वात महत्वाचे असते त्याचे जीवन.

निकोलाई आस्त्रोवास्की हे युक्रेन मधील एक समाजवादी, यथार्थवादी लेखक, तत्वज्ञानी होऊन गेले. त्यांचे हाऊ द स्टील वाज टेंपर्ड हे ऊपन्यास प्रसिद्ध आहे. त्यांच्या मते मनुष्याच्या जिवनात सर्वोच्च स्थानी काही असेल तर ते म्हणजे त्याला मिळालेले जीवन आणि ते जगण्यासाठी त्याला मिळते एक जीवन. मग त्याला ते जीवन असे काही जगायचे आहे की, कधी त्याला पश्चातापाच्या अग्नीमध्ये जळावे लागू नये की, मी जिवनातील महत्वाची वर्षे वाया घालवली. जेणे करून एक क्षुद्र व तुच्छ भूतकाळ घालवल्याबद्दल शरम वाटू नये. त्याने असे जगावयास हवे की, जेव्हा तो मृत्यू शय्येवर असेल तेव्हा म्हणू शकेल की, मी माझे संपुर्ण जीवन, सर्व शक्ती विश्वाच्या सर्वोच्च अशा महान कार्यासाठी लावले, मानव मुक्तीसाठी लावले. तसेच मनुष्याला हवे आहे की, त्याने एकही क्षण न दवडता प्रत्येक क्षणाचा ऊपयोग करावा. कारण की, कोणजाणे एखाद्या अपघाताने किंवा आजाराने त्याच्या जीवनाचा दोर कापल्या जाईल?
वरील विधान अतिषय महत्वपुर्ण वाटते. सामान्यत: जीवना विषयी मनुष्याचा दृष्टीकोण म्हणजे काम-धन्दा करणे, खाणे-पिणे, मौज करणे एवढाच काय तो दिसून येतो परंतू तो योग्य वाटत नाही. सामान्यपणे मनुष्याच्या जन्मात येऊनही काही लोक मात्र आपली बुद्धी, मेहनत, कल्याणकारी विचार, कार्य यामुळे ईतरांसाठी देव ठरले. अशा काही मोजक्या लोकांनी हे विश्व समृद्ध केले आहे असे म्हणायला हरकत नाही. तसे पाहीले तर हा अधिकार निसर्गाने प्रत्येकाला दिला आहे व त्याकरीता सारासार विचार करण्याची बुद्धीही त्याला दिली आहे. हा निसर्गाचा मोठा चमत्कारच मानायला हवा व या करीता त्याचे मनापासून आभार मानायला हवेत. त्यामुळे काही जण आपल्या बुद्धीचा वापर करून जीविका करीत असतात.
आपले व कुटूंबाचे पालन-पोशन करीत असतात. परंतू बुद्धीमान लोक कुटूंबाशी व सामाजाशीही ईमानदार राहून ते सर्वांसाठी कल्याणकारी विचार व कार्य करीत असतात व कुटूंबाला, समाजाला व देशाला भूषणावह ठरतात. अशा गुरू,संत आणि महापुरूषां मध्ये गणना होते ते म्हणजे ज्ञाणाचे प्रतिक ( Symbol of Knowledge ) बाबासाहेब डाॅ.आंबेडकरांची ! त्यांनी जिवनाचे महत्व जाणून घेऊन कोट्यावधी जनांना मुक्तीचा मार्ग दाखविला. त्यांच्या मते “मानवी जिवनाचे अंतिम लक्ष हे बुद्धीचा विकास असायला हवे” कारण की, बुद्धीच्या विकासानेच आज पृथ्वी वरती सुख, सुविधा व समृद्धी आहे. तसेच माजी न्यायमुर्ती बी.एन.वाघ यांच्या मते विचारच सर्वोच्च आहे. त्या शिवाय मनुष्य योग्य जीवन जगू शकणार नाही.
आणखी सखोल विचार करू गेल्यास हे दिसून येते की, बाबासाहेब डाॅ.आंबेडकरांचे गुरू व सामाजिक क्रांतीचे प्रणेते म. जोतीराव फुले म्हणतात की, निर्मिकाचा मनुष्याला जन्माला घालण्याचा हेतूच हा आहे की, त्याने जगाची व्यवस्था निटनेटकी लावावी. त्याचा जन्म यारीताच झाला आहे व त्या करीता त्याला बुद्धी व विवेक दिला आहे. त्याने जर तसे कार्य मनापासून केले तर निर्मिकाची त्याच्यावर अगाध लिला होणार आहे. त्या मुळे वरील प्रमाणे निकोलाई अस्त्रावोस्की चा विचार सार्थक ठरू शकतो व प्रत्येक जण आपले जीवन सार्थकी लावू शकतो. गरज आहे ती केवळ त्या दिशेने विचार करण्याची व तो विचार सामाजिक परिवर्तन कार्यानेच स्पष्ट होऊ शकतो
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत