दिन विशेषदेशमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

याला म्हणतात आंबेडकरी समाजाची दानत…!

आंबेडकरी समाजातील औफिसर्स फोरमने आज कायद्याचा विद्यार्थी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निवासस्थानी 11 लाखांचे आर्थिक सहाय्य करून नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नालंदा विपश्यना केंद्रात तथागत गौतम बुद्धांना वंदन, संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून येथे असलेल्या बाबासाहेबांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेतले.
लोकनेते शहिद विजयराव वाकोडे यांच्या कुटुंबियांना 5 लाख 11 हजारांचे आर्थिक साहाय्य या टीमने देऊ केले असून आज‌ त्यापैकी आज 1 लाख 11 हजार आर्थिक साहाय्य केले तर‌ उर्वरित रक्कम येत्या पंधरा दिवसांत देणार असल्याचे याकामी पुढाकार घेतलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उप कुलनिबंधक सुरेश हिवराळे यांनी ‘नालंदा’त सांगितले.
याप्रसंगी सेक्रेटरी भीमप्रकाश गायकवाड, acting Treasurer भा ना इंगळे, सदस्य बी बी बडेराव यांची उपस्थिती होती. Working Daw असल्याने अध्यक्ष करण गायकवाड उपस्थित राहू शकले नाही याची खंत वाटते.

अभिमान वाटतो आंबेडकरी समाजाच्या दानतचा !
सर्वांचे अभिनंदन !!

संविधानाच्या सन्मानार्थ शहिद झालेल्या लोकनेते विजयराव वाकोडे आणि आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना शासनाने देऊ केलेल्या देऊ केलेल्या: पण दोन्ही कुटुंबियांनी नाकारलेल्या आर्थिक (सोमनाथ सूर्यवंशी- 10 हजार आणि विजय वाकोडे- 5 हजार) साहाय्यापेक्षा ही रक्कम अधिक आहे हे विशेष !

जय जय जय जय
जय भीम !
जय संविधान !!
जय भारत !!!

भीमप्रकाश गायकवाड,
‘मूकनायक’,
रविराज पार्क, परभणी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!