“पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंबाबत केलेल्या विधानामुळे”; उपस्थितांमध्ये एकच हशा!

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बीडमधल्या परळीत शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. हा कार्यक्रम आज परळीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणेच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच केलेल्या भाषणातून पंकजा मुंडे यांनी यावेळी केलेल्या मिश्किल टिप्पणीवर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी सरकारमधील सर्वोच्च स्थानी असणाऱ्या तिन्ही व्यक्ती हजर राहिल्यामुळे कार्यक्रमात ही नेतेमंडळी नेमकी कोणती भूमिका मांडणार? याची उत्सुकता त्यांच्या नेतेमंडळींना व कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळालाही लागलेली होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंबाबत केलेल्या विधानामुळे व्यासपीठावरील मान्यवरांच्या चेहऱ्यावरही हास्याची लकेर उमटली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत