सहकारी पतसंस्था नफा मिळविण्यासाठीच चालवा–किरण गायकवाड

माननीय किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था
सोलापूर शहरात फडकुले सभागृह येथे नवयान अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन मंगळवार दिनांक 31/12/2024 रोजी सायंकाळी 6.00 वा सोलापूर जिल्हा उपनिबंधक मा.किरण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते भागधारक सदस्य व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, सहकारी पतसंस्था या नफा मिळविण्यासाठीच चालवा.काटकसरीने पतसंस्था चालवावी.व्यावसायिक नीतीचे काटेकोर पालन करावे .पतसंस्था चालवून कष्टकरी व वंचित समुहाचे दारिद्र्य निर्मूलन करावे असा सल्ला दिला.
तत्पूर्वी सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयालयातील वरिष्ठ अधिकारी श्री आर.एन.ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली नवयान अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीची पहिली सर्व साधारण सभा पार पडली.यावेळी श्री आर.एन.ढोणे यांनी नवयान अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
यावेळी नवयान अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री प्रदीप कांबळे यांनी प्रास्ताविक केले.नवयान पतसंस्था ही महिला व पुरुष बचत समुहाच्या माध्यमातून चालू झालेली पतसंस्था आहे.बचत गटाकडून पतसंस्थेकडे तसेच बचतीतून समृद्धी कडे असे संस्थेचे कार्य असणार आहे.या पतसंस्थेचे कामकाज पहिल्या दिवसापासून डिजीटल असणार असून ग्राहकाभिमुख असणार आहे.
अध्यक्षांनी संस्थेचे सचिव म्हणून डॉ. अरुणकुमार प्रल्हाद इंगळे आणि कोषाध्यक्षपदी डॉ. मारुती दगडू शिंदे यांची कार्यकारिणीने एकमताने निवड केल्याचे जाहीर केले.
प्रा.डॉ.एम.डी.शिंदे यांनी सर्व पदाधिकारी आणि संचालकांचा खुमासदार शैलीत परिचय करून दिला.
नवयान अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे सचिव डॉ अरुणकुमार इंगळे यांनी ‘ नवयान ‘ या नावाचा इतिहास विषद करून सोसायटीच्या अर्थकारणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्माचे अधिष्ठान असणार आहे याची ग्वाही दिली.
संस्थेची 2618 सभासद नोंदणी करण्यासाठी प्रवर्तक मंडळाबरोबरच ज्या 45 ते 50 कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले त्यांचा जिल्हा उपनिबंधक माननीय किरण गायकवाड साहेब यांच्या हस्ते पंचशील उपरणे आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
नवयान अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या पहिल्या सर्व साधारण सभेस संस्थेचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
डॉ.अंगद मुके यांनी आभार मानले.श्री शाम शिंगे सर यांनी कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन केले. सामुदायिक राष्ट्रगीत गायनानंतर चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत