निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

महाविकास आघाडीत स्त्रियांना समान संधि; मग भाषणाला कमी वेळ का देता ? – रोहिणी खडसे यांची शरद पवारां समोरच नाराजी व्यक्त

जामनेर : काल शरद पवार यांच्या उपस्थितीत येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यास मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन पर बोलताना एक वेगळाच प्रकार घडला.

रोहिणी खडसे या बोलण्यासाठी उभ्या असताना त्यांना “आवरत घ्यावं” अशी चिठ्ठी देण्यात आली. यावर रोहिणी खडसे नाराज झाल्या व शरद पवारांच्या समोरच त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

“शरद पवारांनी आम्हाला समान हक्क दिलेला असून व्यासपीठावरील पुरुष बोलू शकतात तेवढा आमचाही अधिकार आहे. एका महिलेला पाच मिनिटे बोलायला सांगाल तर कसं चालेल अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी शरद पवारांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. तसेच आपण महायुतीच्या व्यासपीठावर नाही तर महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आहोत आणि तिथे महिलांना समसमान अधिकार आहेत,” असेही रोहिणी खडसे म्हणाल्या.

दरम्यान, यावेळी बोलताना रोहिणी खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरही महत्वाचे विधान केले. नाथाभाऊ कोणत्या परिस्थितीत भाजपमध्ये जात आहेत, हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही. आमच्या रक्तात गद्दारी नाही, असे त्या यावेळी म्हणाल्या.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!