कॉंग्रेस पक्ष संविधान वाचवेल का.?


भाजपा संविधान बदलणार आहे म्हणून भाजपला हटवून कॉंग्रेस पक्षाला सत्ताधारी बनवा असा सुर विचारवंत म्हणवून घेणारे काही पडीक लोक आळवतं आहेत…!!
ज्यांना असं वाटतयं की, भाजप आणि कॉंग्रेस हे एकमेकांचे विरोधी पक्ष आहेत.विरोधी विचारधारेचे राजकीय पक्ष आहेत ते सगळेजण मग ते विचारवंत असो की, राजकीय पंडीत असो ते सवर्णांनी मांडलेली थिअरी फॉलो करीत आहेत.सवर्णांच्या हिताची भाषा इतरांच्या तोंडून वदविली जाते तसा हा प्रकार आहे. सवर्णांनी विणलेल्या जाळ्यात अडकलेले हे कबुतरं आहेत…!!
भाजपा आणि कॉंग्रेस हे दोन्ही सवर्णांचे राजकीय पक्ष आहेत आणि म्हणून त्यांची विचारधारा एकच आहे. दिखाव्या साठी, ओबीसी, एस. सी. एस. टी. आणि अल्पसंख्याक समुहाला भुल देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने सेक्युलर असल्याचा बुरखा पांघरलेला आहे…!!
स्वातंत्र्यापूर्वी कॉंग्रेस पक्षात एक जहाल आणि दुसरा मवाळ असे दोन गट होते. सवर्णांनी त्या दोन गटाचे दोन राजकीय पक्ष बनविले. आज तेच दोन गट जहाल म्हणजे भाजपा आणि मवाळ गट म्हणजे कॉंग्रेस होय…..!!
भाजपा आणि कॉंग्रेस पक्षाचे धेय्य आणि धोरण एकच आहे. सत्तेत असतांना काम करण्याची पद्धत सुद्धा सारखीच आहे.उदाहरणे अनेक आहेत नमुन्यासाठी एक दोनच उदाहरण बघू….
आर्थिक पातळीवर भाजपा आणि कॉंग्रेस पक्षाचे एकच धोरण आहे…!!
खाऊजा(खाजगीकरण,ऊदारीकरण,जागतिकीकरण.)धोरण कॉंग्रेस पक्षाच्या मनमोहन सिंह यांनी आणले, त्या धोरणाचा पुरेपूर वापर करून भाजपा सरकारने खाजगीकरण, निर्गुंतवणूकीकरण,करुन देशातील धनदांडग्या मुठभर लोकांच्या हातात देशाची संपत्ती जमा करून ठेवली ….!!
देशाची आर्थिक सत्ता सवर्णांच्या हातात असावी या ध्येयासाठी कॉंग्रेस आणि भाजपने गेले २०-२५ वर्षे मिळून काम केले. त्याचा परिणाम आज असा आहे की, देशातील ५०.५४% संपत्ती.म्हणजे अर्धीअधिक संपत्ती एक टक्का सवर्णांकडे आहे. हे सरकारी आकडे आहेत…!!
कॉंग्रेस आणि भाजपचे भांडणं कशासाठी आहे तर कोणत्या भांडवलदाराला जास्त आणि कोणत्या भांडवलदाराला कमी वाटा मिळतो त्यासाठी. कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकाळात टाटा, स्वराजपॉल, जिंदाल, महिंद्रा गृप ला जास्त वाटा मिळतं होता. आता भाजपच्या काळात अदानी, अंबानी गृपला जास्त वाटा मिळतोय म्हणून विरोध आहे. लूटूपुटूचे भांडणं मिडिया मार्फत दाखविले जाते. आणि भाबळी जनता कॉंग्रेस आणि भाजपा विरोधक आहेत असे समजतात.वस्तुस्थिती अशी आहे की,ते विरोधक नाहीतच….!!
परंतु देशाची संपत्ती एक टक्का लोकांकडे एकवटली आणि देशात प्रचंड मोठी आर्थिक दरी निर्माण झाली. आर्थिक समतोल बिघडला आणि म्हणून प्रचंड महागाई वाढली यासाठी कॉंग्रेस पक्ष विरोधी बाकावर असुनही आंदोलन करीत नाही.कृती कार्यक्रम आखतं नाही,जनजागृती करीत नाही,विरोध करीत नाही…!!
सांस्कृतिक पातळीवर कॉंग्रेस आणि भाजपचे धोरण एकच आहे...!!
धार्मिक आणि जातीय दंगली घडवून मतांचे धृवीकरण करुन सत्ता हस्तगत करण्याची रीत कॉंग्रेस आणि भाजपची एकसारखीच आहे...!!
बाबरी मशीद उध्वस्त करायची हे धोरण भाजपचे, आरएसएस चे परंतु अमंलबजावणी केली ती कॉंग्रेस पक्षाने, बाबरीचे कूलूप ऊघडले कॉंग्रेस पक्षाच्या राजीव गांधी यांनी आणि बाबरी उध्वस्त केली कॉंग्रेस चे प्रधानमंत्री पी. व्ही नरसिंहराव आणि गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात…!!
राजकीय पातळीवर कॉंग्रेस आणि भाजपचे धोरणही एकच आहे...!!
सांसदीय लोकशाहीचे बळकटीकरण होऊन मतदार आपल्या हक्क आणि अधिकाराप्रती जागरुक झाला तर सवर्णांचे राजकारण अल्पसंख्य असल्यामुळे धोक्यात येऊ शकते म्हणून कॉंग्रेस पक्षाने EVM चे भुत भारतीय निवडणुकीत आणले. हवा तसा वापर करून सत्ता मिळविली आणि त्याचा पुरेपूर गैरवापर करून भाजपाने सत्तेचा आस्वाद घेतला आहे… !!
भाजपा आणि कॉंग्रेस दोन्ही पक्ष EVM चा विरोध करीत नाहीत….!!
देशाच्या आर्थिक विकासात मोठा वाटा असलेल्या शेतकरी वर्गाच्या संदर्भातील भाजपा आणि कॉंग्रेस पक्षाचे धोरण सुद्धा एकसारखे आहे…!!
आलटून पालटून सत्ता ऊपभोगणा-या कॉंग्रेस आणि भाजपा ने शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव दिला नाही आणि देण्याची त्यांची मानसिकता सुद्धा नाही…!!
कॉंग्रेस पक्ष एस. सी. एस. टी. ओबीसी आणि अल्पसंख्याक समुहाला भुल देण्यासाठी “गरीबी हटाव” असा नारा जाहीर करतो आणि देशात भांडवली व्यवस्था निर्माण करतोय हा अनुभव आहे…!!
गेल्या ७४ वर्षाचा इतिहास साक्षी आहे. निवडणुका आल्या आणि जनतेचा कल दिसला की, सत्तेसाठी सर्व सवर्ण एका राजकीय पक्षात जमा होतात. कॉंग्रेस मधील मोठे मोठे नेते भाजपमध्ये जातात आणि सत्ता भाजपची स्थापन होते. जनता भाजपला कंटाळली असे लक्षात आले की, भाजपमधील मोठे मोठे नेते कॉंग्रेस पक्षात येतात आणि सत्ता कॉंग्रेस पक्षाची स्थापना होते...!!
संविधान बदलणे हे धेय्य भाजप आणि आरएसएस ने बाळगले आहे आणि जाहीर सुद्धा केले आहे....!!
ज्या प्रमाणे कॉंग्रेस पक्षाने मुस्लिम समुहाची मते घेऊनही बाबरी मशीद वाचवली नाही अगदी त्याचप्रमाणे मते घेऊन आणि सत्तेत बसूनही कॉंग्रेस संविधान वाचवणारं नाही...!!
कॉंग्रेस हा पक्ष सवर्णांच्या हिताचे राजकारण करतोय,नव्हे तो सवर्णांचाच राजकीय पक्ष आहे. आणि सवर्णांनी तर 1949 मध्येच जाहीर केले आहे की, आम्हाला हे संविधान मान्य नाही .आणि आमची सत्ता आली तर आम्ही संविधान बदलू.आणि म्हणून कॉंग्रेस पक्ष संविधान वाचविण्याच्या मानसिकतेचा राजकीय पक्ष नाही....!!
कॉंग्रेस पक्ष आजची परिस्थिती बघून.सत्तेसाठी,मतांसाठी,लोकशाही वाचवायची आहे, संविधान वाचवायचे आहे अशी आवई ऊठवेल आणि सत्ता मिळाली की, सवर्णांच्या हितासाठी संविधान बदलण्याचे पाप करेल ही शक्यता जास्त आहे...!!
सवर्णांच्या हितासाठी गेले ६० वर्षे सत्ता राबविणाऱ्या कॉंग्रेस पक्षावर विश्वास ठेवता येणार नाही…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत