दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

उल्हासनगर मध्ये संविधान सन्मान भव्य रैली चे आयोजन !

♦️केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल
केलेल्या वक्तव्याच्या व परभणी येथील ऍड सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यू च्या निषेदार्थ उल्हासनगर मध्ये संविधान सन्मान भव्य रैली चे आयोजन !

           ✅लोकसभेत सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त आणि अपमानास्पद वक्तव्य केले आहे. त्यांनी असे विधान केले की, "आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर बोलणा एक फैशन हो गया है और ये बोलने से अच्छा ईश्वर का नाम लेते तो सात जनम का पुण्य मिलता."

हे विधान अत्यंत अनुचित असून, केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नव्हे, तर भारतीय संविधानाचा आणि संपूर्ण आंबेडकरी जनतेचा अपमान करणारे आहे.
👆🏻तसेच परभणी येथील बाबासाहेबांचा पुतळ्याचा विटंबना प्रकरणी पोलिस कारवाही मध्ये ऍड सोमनाथ सूर्यवंशी ह्यांच्या दुदैवी मृतूत दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाही साठी , उल्हासनगर मध्ये सर्व पक्षीय एवं संघटनां तर्फे संविधान सन्मान रैली चे आयोजन करण्यात आले होते , ज्याला उल्हासनगर काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला.
सदर रैली डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा , चोप्रा कोर्ट ते प्रांत कार्यालय पवई येथे संपन झाला , सदर रॅलीत हजारो च्या संख्ये जे संविधान प्रेमी जनता व उल्हासनगर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्तिथ होते.
👉🏻सदर रैली नंतर उल्हासनगर काँग्रेसच्या शिष्ट मंडळाने प्रांत अधिकाऱ्याची भेट घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या नावाचे निवेदन दिले , त्या मध्ये केंद्रीय गृह मंत्री अमित शहा ह्याने अपमानास्पद विधानाबद्दल जाहीरपणे देशातील जनतेची माफी मागावी. तसेच, आपण तात्काळ त्यांचा गृहमंत्रीपदावरून राजीनामा घेण्याचे मागणी केली.
सदर आंदोलनात माजी नगरसेविका अंजली साळवे, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके ,महिला अध्यक्ष मनीषा महाकाळे, अशेराम टाक, प्रोफ गेम्नांनी, प्रो सिंधुताई रामटेके, विशाल सोनवणे , मालती गवई , विजय मोरे, अमोल राऊत व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येंनी उपस्तित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!