फॅसिझम म्हणजे ब्राम्हण्यशाही— डॉ भालचंद्र मुणगेकर .

अंबरनाथ दि.16 : फॅसिझम मध्ये विरोध चालत नाही, फॅसिझम विरोधकांच्या बदनामीची एकही संधी सोडत नाही, फॅसिझम म्हणजे ब्राम्हणीशाही असे उदगार माजी खासदार, माजी कुलगुरू, अर्थतज्ञ् डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी अंबरनाथ येथे फॅसिस्ट राजवटीतील कंत्राटीकरण, खाजगीकरण, आणि आरक्षणाची समाप्ती या विषयावरील वैचारिक परी- संवादात अध्यक्ष पदावरून बोलतांना काढले.
धर्मांध ब्राह्मणी शासनाचे नवे शैक्षणिक धोरण व शासकीय आणि निमशासकीय शाळांची धनदांड यांना विक्री व गरिबांच्या शिक्षणाची नाकेबंदी या विषयावर झालेल्या परीसंवादात ऍड. किरण चन्ने, रवींद्र चंदणे, प्रताप होगाडे, आदींनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी सकल समाजाच्या नेत्या ऍड. निरंजना शेट्टी होत्या. सूत्रसंचालन कल्याण महापालिकेचे माजी अभियंता मिलिंद गायकवाड यांनी केले.
दोन्ही परीसंवादाच्या समारोपचा गोषवारा रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड यांनी मांडला. राज्यातील 67 हजार शाळांचे खाजगीकरण करण्याचे काम सुरु आहे. परंतु शाळे खालील जमिनी कुठे जाणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सफाई कामगारांचा वारसा हक्काचा कायदा बदलला आहे त्या करिता न्यायालयीन लढाई लढावी लागेल. तुमच्या पासून जमीन, जंगल, नद्या, नाले हिरावून घेतले जात आहे त्यामुळे आता बीजेपीला हरविणारे त्याच्या पाठीमागे उभे राहायला हवे असे ही श्याम गायकवाड म्हणाले.
कालकथित शंकर आनंदा गायकवाड, माजी आय.ए. एस अधिकारी, माजी विभागीय आयुक्त आदिवासी विभाग यांच्या स्मृती प्रितर्थ धम्मदेसना, आदरांजली व वैचारिक परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी बौद्धाचार्य पोपट जगताप व सकपाळे गुरुजी यांनी बुद्ध वंदना घेतली. पूज्य भन्ते आयुपाल यांनी मृत्यु संदर्भात वैचारिक मार्गदर्शन केले. मृत्यु पूर्वी माणूस जिवंत असतांना त्याची योग्य सेवा करावी, अन्न व औषधाची पूर्तता करावी, मृत्यूपूर्वी त्याचाशी संवाद असावा अशी वैचारिक धम्मदेसना दिली.
श्रद्धांजली सभेत माजी अति. जिल्हाधिकारी कमलेश सोनाळे, रिपब्लिकन कामगार व पॅन्थर नेते प्रकाश पगारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सदामामा पाटील, पारमिता उबाळे, राहुल हंडोरे, सुधाकर बर्वे, नारायण भालेराव, नारायण सोनकांबळे, बी बी मडीखांबे, राजू उबाळे, आदींनी आदरांजली वाहिली. सूत्रसंचालन माजी प्राचार्य, डॉ अरविंद उबाळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ प्रशांत गायकवाड आणि गायकवाड परिवार यांनी केले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत