दळवींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी.

मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्याना अपशब्द वापरल्याच्या आरोपातील जामीनअर्जावर गुरुवारी युक्तीवाद झाला. पण, न्यायलयाची वेळ संपल्यामुळे आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता यावर न्यायालय निकाल देणार आहे. या निकालात जामीन मंजूर होण्याची शक्यता आहे.
दळवी यांच्या जामीनअर्जावर महानगर दंडाधिकारी एम. आर. वाशिमकर यांच्या सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला. दळवी यांच्या वकिलांनी ते जबाबदार नागरिक असल्याचा युक्तिवाद केला. त्यांनी दोन पक्षात असलेल्या अंतर्गत वादामुळे हे वक्तव्य केले. ते मुंबईचे रहिवासी आहेत. पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालय जामीनअर्जावर निकाल देणार होते; परंतु न्यायालयाचे कामकाज संपल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपामुळे संतप्त झालेल्या शिंदे समर्थकांनी दळवी यांच्या गाडीची तोडफोड केली. दळवी यांच्या घराच्या परिसरात गाडीची तोडफोड करण्यात आली.बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशी दळवी यांची ओळख आहे. ईशान्य मुंबईत त्यांचा प्रभाव आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत