प्रा डॉ उध्दव भाले यांना संशोधनातील भारतीय पेटंट
प्रा डॉ उध्दव भाले यांचे १७० पेक्षा जास्त शोध निबंध अंतर राष्ट्रीय पातळीवर प्रकाशित
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. उध्दव भाले यांना विविध वनस्पतीमधील मानवासाठी उपयुक्त असणारे पोषक अन्नद्रव्ये कोणते असू शकतात यावर आधारीत “फायटोकेमिकल विश्लेषणासाठी मल्टीचेंबरड डिव्हाइस” यासाठी भारतीय पेटंट नुकतेच मिळाले आहे. डॉ भाले हे सातत्याने संशोधनाचे कार्य करीत असतात , त्यांचे आतापर्यंत १७० पेक्षा जास्त शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झालेले आहेत. सत्तर पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १२ विध्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे आणि सद्या ७ विध्यार्थ्यांचे संशोधन चालू आहे. त्याचबरोबर त्यानी युजीसी, डीएसटी चे प्रकल्पही पूर्ण केलेले आहेत. त्यांचे संशोधन हे पिकावरील पडणाऱ्या रोगांचे एकात्मिक पद्धतीने निमूर्लन आणि पिकांची सेंद्रीय पद्धतीने वाढ यावर आधारीत आहे. त्यांच्या या संशोधनामुळे २०२३ पासून सातत्याने दोन वर्षापासून जागतिक शास्त्रज्ञाच्या यादीत त्यांना नामांकन प्राप्त झालेले आहे. त्याच आधारावरील हे भारतीय पेटंट मिळाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष राठोड, कार्यालयीन अधिक्षक श्री.धनंजय पाटील आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी कॅबीनेट मंत्री मा. मधूकररावजी चव्हाण, सचिव मा. उल्हासदादा बोरगांवकर आणि संस्थेच्या सर्व संचालकानी व गावातील नागरिकांनी अभिनंदन केले . प्रा. दिपक जगदाळे नळदुर्ग
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत