नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्यात तिरंगा ध्वजाला पोलीस प्रशासनाकडून सन्मानपूर्वक मानवंदना

नळदुर्ग शहरातल्या विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनीनी ही दिली मानवंदना
प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध शाळेत पारितोषक वितरण समारंभ सोहळा संपन्न
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग ऐतिहासिक नगरीत महाराष्ट्रात सर्वात मोठा किल्ला म्हणून ओळखला जातो या ऐतिहासिक शहरात खुप मोठ्या प्रमाणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यामध्ये ऐतिहासिक किल्ल्यामध्ये नळदुर्ग शहरातील अप्पर तहसिलदार जगताप व पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या प्रमुख हस्ते फोटो प्रतिमा पुजन करण्यात आले यावेळी अप्पर तहसिलदार
जगताप व पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक साळुंखे पोलीस उप निरीक्षक ईश्वर नांगरे व पोलीस कर्मचारी यांनी सन्मान पुर्वक मानवंदना दिली याबरोबर नगर परिषद नळदुर्ग येथील मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
यावेळी डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मेडीयम स्कुलचे मुख्य प्रवर्तक तथा संस्थापक मारुती खारवे नळदुर्ग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सय्यद अब्दुल्ला मेमोरीयल उर्द हायस्कुल , जिल्हा परिषद कन्या प्रशाला नळदुर्ग , हुतात्मा स्मारक नळदुर्ग डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह अधिक्षक एम एस शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर नळदुर्ग येथे उप जिल्हा रुग्णालय नळदुर्ग आदि ठाकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे पारितोषीक वितरण समारंभ विद्यार्थ्यांना शैक्षणिक चालना मिळावी प्रेरणा मिळावी यासाठी वह्या पेन मिडल रजिस्टर पुष्प गुच्छ देऊन विद्यार्थांना गौरविण्यात आले . यावेळी नळदुर्ग शहरातील ऐतिहासिक किल्ल्यात गावातील माजी नगराध्यक्ष सह माजी नगरसेवक प्रतिष्ठीत नागरिक मंडल अधिकारी तलाठी यांच्या सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत