
दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने शीख विरोधी दंगलीदरम्यान सुलतानपुरी येथे झालेल्या एका प्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार आणि इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. हे प्रकरण तीन शीखांच्या कथित हत्येशी संबंधित होते.
दरम्यान आज पार पडलेल्या या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली असली तरीही ते तुरुंगातच राहणार आहेत. कारण 1984 शीख दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
1984 मध्ये झालेल्या दंगलीत शीख पिता-पुत्राची हत्या करण्यात आली होती. जमावाने जसवंत सिंग आणि तरुण दीप सिंग यांची हत्या केली होती. यावेळी काँग्रेस नेते सज्जन कुमार या जमावाचे नेतृत्व करत असल्याचा आरोप आहे. त्यांनीच बाप-लेकास जाळून टाकण्यासाठी चिथावणी दिल्याचे आरोप आहे.
सज्जन कुमार यांच्यावर जसवंत सिंग आणि तरुण दीप सिंग यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचाही आरोप आहे. दिल्लीच्या सरस्वती विहार पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सज्जन कुमार यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 147, 149, 148, 302, 308, 323, 395, 397, 427, 436, 440 अन्वये दंगल, खून आणि दरोडा यासारखे आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सज्जन कुमार यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांना 6 एप्रिल 2021 रोजी अटक करण्यात आली. सध्या ते याच दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाने 17 डिसेंबर 2018 रोजी सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 1984 च्या शीखविरोधी दंगलीनंतर दिल्लीत पाच शीख मारले गेले आणि एक गुरुद्वारा जाळण्यात आला. या प्रकरणात सज्जन कुमार दोषी आढळल्याने त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत