वनसंवर्धन दिन
डॉ. मिलिंद हिरवे,
@ २३ जुलै @
वृक्ष जे त्यागाच्या भावनेने स्वत: उन्हात उभे राहतात, पण इतरांना सावली देतात; ज्यांची फळे-फुलेही दुसर्यांसाठीच असतात, असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषा सारखेच भासतात. सामान्य माणूसही नेहमीच्या दगदगीपासून दूर जाण्यासाठी, हवापालटासाठी थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यातच जातो. अशा या उपकारकर्त्या वृक्षांचा आज ऱ्हास होत आहे. मानवाने बेसुमार जंगलतोड करून वैराण वाळवंटे निर्माण केली आहेत. ‘मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहुल’ अशी म्हण आहे. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली. त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली. दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागत आहे. जंगलात माणूस जितकी कमीत कमी लुडबुड करेल तितके आपले चक्र दुरुस्त करण्याची निसर्गाला संधी मिळेल. जंगलतोड तर थांबलीच पाहिजे पण त्याचबरोबर नवीन झाडेही लावली गेली पाहिजेत. या सर्व गोष्टींचा विचार करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि सर्व लोकांना जंगलाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करणे फार महत्वाचे आहे. आजच्या या वनसंवर्धन दिनी आपण सर्वांनी वनांचे संवर्धन आणि रक्षण करण्याचा संकल्प करूया !
डॉ. मिलिंद हिरवे, कोल्हापूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत