पनवेल येथे पाच दिवसांसाठी मध्यरात्रीचा ब्लॉक

पनवेल येथे तांत्रिक कामांसाठी आणि मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामासाठी हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात आल्यानंतर आता पनवेल येथे सोमवारी रात्रीपासून ते शुक्रवापर्यंत पाच दिवसांसाठी मध्यरात्रीचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सोमवारी ते शनिवापर्यंत रात्री १२.३० वाजल्यापासून ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत या मार्गावर लोकल धावणार नाही.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमधील अप आणि डाऊन दोन नवीन मार्गिकेच्या बांधकामासाठी आणि उपनगरीय यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी पनवेल येथे शनिवार व रविवारी ब्लॉक घेतला. त्यानंतर पनवेल येथे तांत्रिक दुरुस्तीनंतरची काम करण्यासाठी ईएमयू स्टॅबिलग साइिडग क्रमांक १,२,३,४ आणि १० येथे पाच दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. आता पाच दिवस रात्री या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी येथून पनवेलसाठी ब्लॉक कालावधीत वेळापत्रकानुसार असेल. ३ ते ७ ऑक्टोबपर्यंत ठाण्याहून पनवेलसाठी ब्लॉक संपल्यानंतर पहिली लोकल सकाळी ६.२० वाजता ठाण्याहून सुटून सकाळी ७.१२ वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेलहून अप हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेलहून पहाटे ५.४० वाजता सुटेल आणि सकाळी ६.५९ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ब्लॉकनंतर पनवेलहून अप ट्रान्सहार्बर मार्गावर ठाण्याच्या दिशेने पहिली लोकल सकाळी ६.१३ वाजता पनवेलहून सुटेल आणि सकाळी ७.०५ वाजता ठाण्याला पोहोचेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत