महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

आजपासून डिलाईल रोड ब्रिज नागरिकांसाठी खुला.

डिलाईल रोड ब्रिज आजपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. रविवारी मनसे आणि शिवसेना ऊबाठा गटाने हा पूल सुरू व्हावा यासाठी आंदोलन केलं. यानंतर दिपक केसरकर यांनी याठिकाणी दाखल होत या पूलाचं उद्घाटन केलं. अनेक अडचणींचा सामना करत हा ब्रिज खुला झाला आहे. पाचवेळा या पुलाच्या उद्घाटनाची तारीख देण्यात आली होती, मात्र अखेर आज त्याला मुहूर्त मिळाला आहे. हा पूल धोकादायक झाल्याच्या कारणास्तव देखभालीसाठी २४ जुलै २०१८ पासून वाहन आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला होता. पुलाचं काम मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वे करत होती. यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये रेल्वे हद्दीवरील पुलाचा भाग तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली.

या पुलावर पहिला गर्डर बसवण्याचे काम जून २०२२ मध्ये पूर्ण करण्यात आले. तर दुसरा गर्डर २४ सप्टेंबर २०२२ ला बसवण्यात आले. दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडीनंतर तब्बल पाच वर्षानंतर हा ब्रिज सुरू करण्यात आलाय. यामुळे लालबाग-परळकरांची वाहतुक कोंडीची चिंता मिटणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!