“बोलून मोकळं व्हायचं” – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील संवाद.

मराठा आरक्षणाविषयी बोलण्याआधीचा एक व्हिडीओ जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओवरून या तिघांनाही ट्रोल केलं जातं आहे. आपण बोलून मोकळं व्हायचं असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंबंधी जी बैठक झाली त्यानंतरच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला बोलत होते तो हा व्हिडीओ आहे.
मराठा आरक्षणाबाबत जी चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याआधी हा संवाद झाला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केलं जातं आहे. संभाजी भिडे यांनी मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाड नाहीत, फडणवीस फसवणूक करणार नाहीत आणि अजित पवार काळीज असलेला माणूस आहे अशी भावनिक साद मनोज जरांगे पाटील यांना घालत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्याचाही संदर्भ या व्हिडीओमध्ये देऊन या तिघांनाही ट्रोल केलं जातं आहे. तर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत