MSRTC स्लीपर कोच मुंबई ते गोवा धावणार.

स्लीपर कोचमध्ये प्रवाशांसाठी ३० स्लीपर बेड आहेत. या बस सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज आहेत. गणेशोत्सव काळात मुंबई आणि पणजी दरम्यान कोकण मार्गे चालवली जाण्याची शक्यता आहे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. आठवड्याच्या अखेरीस दहा नवीन स्लीपर नॉन-एसी कोच एसटीच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी दिली.
यापैकी एक बस गणेशोत्सव काळात मुंबई आणि पणजी दरम्यान कोकण मार्गे चालवली जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. पणजीच्या बस मार्गाचे भाडे अद्याप ठरलेले नाही. एक-दोन दिवसांत त्याबाबत घोषणा होईल. स्लीपर कोचमध्ये प्रवाशांसाठी ३० स्लीपर बेड आहेत. या बस सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबरदरम्यान ३१०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत देण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत