मुलांना आणि मोठ्यांनाही खुप शिकवुन जाणारा बालमहोत्सव
- सुमित्रा देशमुख,
सावित्री महिला संघटना
सोलापूर.
नागेश ऑर्चिड स्कुल मधील एका प्रशस्त हाॅलमध्ये 5 वी ते 8 वी मधील 70 मुले-मुली जमलेली. नाटक, अभिनय म्हणजे काय याचे प्राथमिक प्रशिक्षण मुलांना किरण लोंढे सर देत होते. त्यांनी प्रश्न विचारले ‘ तुम्ही आपसात भांडता का ?’ सर्व हो म्हणाले. ‘मग आता खोटेखोटे पण खरे वाटेल असे भांडायचे ‘ यासाठी कोणकोण तयार आहेत ? 5/6 जण तयार झाले. मग सरांनी दोन मुलांना पुढे बोलावले, कुठल्या विषयावर भांडायचे ते मुलांशी चर्चा करुन ठरविले, शिवीगाळ व मारामारी मात्र करायची नाही असे बजावले व भांडण सुरु करायला सांगितले. नंतर दोन मुलींना नळावरची भांडणे करायला सांगितले. ही दोन्ही भांडणे इतकी रंगली की ते पाहणारी सर्व मुले त्यांना चांगलीच दाद देत होती. मग लोंढे सरांनी अभिनय व नाटक म्हणजे काय हे अनेक उदाहरणे देवून समजावून सांगितले. शिवाय एक तासामध्ये 10 मिनिटांचे एक नाटुकले त्यांच्याकडून बसवून देखील घेतले.
सोलापूरात भरविण्यात आलेल्या दोन दिवसांच्या बाल महोत्सवातील वरील एक प्रसंग आहे. दोन्ही भांडणांमध्ये मुलांची विचार शक्ती आणि सर्जनशीलतेचा उत्कृष्ट अविष्कार अनुभवास आला.मनात विचार आला की या गरीब वस्त्यांमधील मुलांना चांगले व योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुले कुठल्या कुठे पुढे जातील ! कारण मुलांचे संगोपन चांगल्या पध्दतीने करणे ही या पालकांसाठी तारेवरची कसरतच असते. मुलांमधील प्रचंड उर्जेला विधायक वळण लावण्यासाठी प्रथम पालकांचे प्रबोधन व्हायला हवे. पण गरीब वस्त्यांमधील पालकांकडे एवढा विचार करायला फुरसत कुठली असायला ? त्यांचा बहुतेक वेळ हा जगण्यासाठी मोलमजुरी करण्यातच जातो. जन्मतःच कुणी हुशार किंवा ढ नसतो. कुटुंबातील व आजुबाजुला जे वातावरण असते, त्यातून ते मुल शिकत व घडत जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर कुटुंबातील माणसे व घरातील वातावरण, ज्या शाळेत ते मुल शिकते तेथील शिक्षक व एकूण वातावरण आणि इतर लोकांचा संपर्क येतो ते लोक म्हणजे समाजातील वातावरण या सर्वांचा परीणाम त्या मुलावर होतो, त्याच्यावर तसेच संस्कार होत असतात. मुलांना काही निराळे पण हसत खेळत काय आणि कसे शिकवावे ही संधी बाल महोत्सवाने मिळवून दिली.
या बाल महोत्सवाचे उद्घाटनच मुळात अनोख्या पध्दतीने करण्यात आले. उद्घाटक प्राचार्य शंकर नवले सर व दोन मुलांच्या हस्ते पाण्याचा दिवा पेटवून केले ! अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निशाताई भोसले यांनी रिकामा दिवा सगळ्यांना दाखविला आणि मुलांनाच त्यात पाणी ओतायला लावले. मग निशा भोसलेंनी झाकण लावले व काडेपेटीने दिवा मुलांनाच पेटवायला सांगितले आणि काय आश्चर्य दिवा पेटला ! नंतर निशाताईने त्यामागचे विज्ञान समजावून सांगितले. दिव्याचे झाकण लावताना कॅल्शियम कार्बाईडचा छोटा खडा हातचलाखीने दिव्यात घातला होता. नंतर मुलांनी त्यात पाणी घातले, पाण्याशी संयोग झाल्यावर अॅसिटीलीन गॅस तयार झाला, त्यामुळे दिवा पेटला. सर्व मुले तल्लीन होवून सर्व प्रक्रिया समजावून घेत होती. अवती भवती घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे बारकाईने आणि डोळसपणे पाहिले पाहिजे व त्या मागचे सत्य तपासले पाहिजे हा धडा यातून मुलांना मिळाला विचारपीठावरील प्रत्येकाने नंतर या अभिनव उद्घाटन पध्दतीची प्रशंसा केली. प्रचार्य शंकर नवले, ऑर्चिड संस्थाप्रमुख कुमार करजगी आणि कोल्हापूरातून या कार्यक्रमासाठी आलेले बाल कल्याण समिती, महाराष्ट्रचे उपाध्यक्ष शामराव देसाई यांनी आपल्या भाषणात त्यांची घडण लहानपणापासून कशी होत गेली ते रंजकपणे सांगितले.
या बाल महोत्सवात खुप सार्या कार्यक्रमांची रेलचेल होती. सगळ्यांचा आढावा घेणे शक्य नाही. गणितातील गंमती जमती आदिती भोसले व तरन्नुम शेख, डॉ. नयना व्यवहारे यांनी आरोग्य व सकस आहार, चला जाणून घेवू शेतीतील विज्ञान यावर डॉ. सतीश करंडे, कागदाची टोपी, पाकीटे व निरनिराळे आकार दिव्या कदम व प्रमिला जाधव यानी शिस्तबध्द रितीने शिकविले. प्लास्टिक पासून मुक्तीचा संदेश देणारे गाणे व नृत्य श्रीनिवास काटवे सरांनी मुलांकडून दोन तासात बसवून घेतले तर जादुगार मिरजी यांनी जादूचे प्रयोग नुसते दाखविले नाहीत तर मुलांकडून ते करुन घेतले ! सुजाता फडतरे यांनी काही अभिनव बैठे खेळ शिकविले व खेळातून प्रेमाची, एकात्मतेची भावना कशी निर्माण होते ते सप्रयोग सांगितले व करवून घेतले. रोबोट म्हणजे काय, तो कसा तयार होतो, त्याचा काय उपयोग इ. माहिती प्रा. कुलकर्णी व वेणेगुर सरांनी सप्रयोग कथन केली. दोन्ही दिवशी…
दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेला लेख
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत