ठाणे मधील घोडबंदर इथे एका रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा…

पार्टीच्या जागेवरुन आठ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कासारवडवली भागात खाडी किनाऱ्यापासून 300 मीटरच्या आत जंगलाच्या परिसरात पार्टी सुरु होती. ठाणे शहरात घोडबंदर इथं एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई करत दोन आयोजकांसह शंभरजणांना ताब्यात घेतलं आहे. नववर्षानिमित्त विशेष ठिकाणी लक्ष ठेवण्याच्या पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेत या ठिकाणचा सुगावा लागल्याचे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले. ताब्यात घेतलेल्यांना पंचनामा करुन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत