नागपूरमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक
पवित्र दीक्षाभूमी नागपूर


हंसराज कांबळे
8626021520
नागपूर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी समाजातील लोकांना उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहित केले आणि विदेशात पाठविले. ते बॅरिस्टर होऊन आलेत. जेणेकरून माझ्या निघून जाण्याने ह्यांनी तरी समाजाचे कार्य सामोरे नेऊन समाजहित साधतील. एवढी इच्छा, आकांक्षा त्यांनी मनी धरली होती. उलट पक्षी ह्यांनी पवित्र दीक्षाभूमी ब्राह्मणी संघाच्या हाती देऊन त्यांना ही आणी आपण ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भरोशावर मालामाल, धनाड्य झालेत. आणि समाजहित पूर्णपणे विसरून गेलेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतोनात कष्टमय जीवन जगून , भोगून , आपल्या अफाट अशा बुद्धी चातुर्याच्या भरोशावर विघातक जातीय वाद्यांचे तोंड ठेचून माता रमाईच्या आग्रहाखातर पवित्र दीक्षाभूमीची उभारणी करून भारतातील आणि विदेशातील स्वाभिमानी बौद्ध बांधव त्या ठिकाणी हक्काची नागभूमी म्हणून नतमस्तक होण्यासाठी बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत झुंडच्या झुंडाने लाखोच्या संख्येने दरवर्षी येत असतात. हीच खरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नीतिमत्तेच्या कृतीतील , इतिहासातील ओळख व पावती आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी एका भाषणात समाजाला उद्देशून म्हटले होते की , तळे राखणारा पाणी चाखेल पण सुज्ञ समाजधारकांनी त्याकडे लक्ष देऊन त्यांचेवर लगाम लावावा
ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणग्रस्त लोक माझे वैरी आहेत आणी त्यांचे घरचे मी बारसे जेवून आहो आपण अशा लोकांपासून सावध राहावे असा मोलाचा संदेश दिला होता.त्याच लोकांच्या मांडीला मांडी लावून लालसेपोटी समाजाला दूर सारून पवित्र दीक्षाभूमी त्यांच्या ताब्यात देऊन तुम्ही जे कराल ते कमेटीला मान्य आहे असे हे समाजविरोधी लोक पायात घुंगरू बांधून नाचत आहेत. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रतारणा, अवहेलना करून पवित्र दीक्षाभूमीला ब्राह्मणी संघाच्या ताब्यात देऊन स्वतः गुलाम बनत असतील तर ह्यांची ही एक ना एक दिवस कत्तलखान्याकडे वाटचाल नक्कीच राहील. हे शाश्वत सत्य आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत