दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान

दिनविशेष – बुधवार दिनांक 29 मे 2024

आज दि. २९ मे २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, बुधवारो, वेसाख मासो, बुधवार, वैशाख माहे.

२९ मे १९२८ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला Protection of the Interests of the Depressed Classes हा ग्रंथ प्रकाशित झाला.

२९ मे १९२८ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांची गाऱ्हाणी व मागण्यांचे दोन छापिल खलिते सायमन कमिशनला बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने पाठविले.

२९ मे १९२९ – रोजी विदर्भातील जळगांव–जामोद येथे मध्यप्रांत व वऱ्हाड प्रांतातील दलित (बहुजन) वर्गाची परिषद विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली. अस्पृश्यांनी धर्मांतर करून अन्य धर्म स्वीकारावा असा ठराव संमत करण्यात आला.

२९ मे १९२९ – रोजी मुक्काम पातुर्डा जिल्हा बुलढाणा येथे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेचे अधिवेशन पार पडले.

२९ मे १९३१ – रोजी डिलाईड रोड, मुंबई येथे अस्पृश्य वर्गाच्या जाहीर सभेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अस्पृश्यांच्यात भांडणे लावणाऱ्या हितशत्रूचा डाव ओळखा.”

२९ मे १९३२ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेकडून मुंबई प्रांतातील दलितांच्या शैक्षणिक स्थितीबद्दल सायमन कमिशनला निवेदन.

२९ मे १९४६ – रोजी दि बाँबे शेड्युल्ड कास्टस इम्प्रुवमेंट ट्रस्टची पहिली सभा विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

२९ मे १९५३ – रोजी चेंबूर, मुंबई येथील “अस्पृश्य संघटना मंडळ” तर्फे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हिरक रूपाने इमारत फंडास १००१/- रुपये अर्पण केले. सदर प्रसंगी त्यांनी सांगितले की, “आपल्याला कमीपणा येईल असा पोशाख करू नका.”

२९ मे २००३ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी माईसाहेब डॉ. सवितामाई भीमराव आंबेडकर यांचा स्मृतिदिन.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!