डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांचा पंजाब मधील होशियारपुर लोकसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात..


होशियारपूर – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर हे त्यांच्या नुकत्याच स्थापन केलेल्या ग्लोबल रिपब्लिकन पार्टी या पक्षातून गॅस सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तेथे 1 जूनला मतदान आहे.
या पूर्वी सन 1962 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भय्यासाहेब तथा यशवंत आंबेडकर हे या होशियारपूर लोकसभा मतदार संघातून उभे राहिले होते, त्यावेळी ते केवळ 10301 मताने हरले होते. यावेळी त्यांचा मुलगा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव यशवंत आंबेडकर जे सन 2014 साली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्यापासून सार्वजनिक समाज कार्यात सहभागी झाले. त्यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी व समता सैनिक दलाची जबादारी आल्यापासून सर्व देश, विदेशात कार्य सुरु करून भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज इत्यादी सर्व समतावादी विचाराचे, संविधान संरक्षणाचे काम काम करत आहेत.
डॉ भीमराव य आंबेडकर हे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव होशियारपूर लोकसभा मतदार संघातून उभे राहिले आहेत, येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दलाची शाखा नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वाल्मिकी,
रविदासी या समाजाची संख्या जास्त आहे. होशियारपूर लोकसभा मतदारसंघात नऊ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून,मतदार संघ पुढीलप्रमाणे आहेत. श्री हरगोबिंदपूर (SC),भोलाथ,
फगवाडा (SC),मुकेरियन, दसूया, उर्मर तांडा, शाम चौरसिया (SC), होशियारपूर, चब्बेवाल (SC) या विधानसभा मतदार संघात स्टार प्रचारक म्हणून भन्ते सुमित रतन,संतोष राणी,ओपी इंदल, सुबचन राम, रेशम कालोह,अनिल बग्गा, डॉ वाय के ठोंबरे, इंद्रजित कालरा, हरदीप कौर, फौजी इंडिया , बाइंडर सरोह, अत्तर सिंग,
हरदवारीलाल यादव, प्रमोद गौतम तसेच दर्शना भीमराव आंबेडकर, चंद्रकला याआहेत. डॉ भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या खात्यावर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया / समता सैनिक दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध संघटना, आंबेडकरी जनता यांनी जवळ जवळ 14 लाख निवडणूक निधी 500 रुपया पासून जमा केला असून अजून निधीचा ओघ चालूच आहे .
निवडणूक प्रचाराकरिता वेगवेगळ्या आठ कमिट्या तयार करण्यात आल्या असून गुरमुखसिग खोसला, अशोक बट्टी,संतोष राणी, जितेंद्र खोसला, इंद्रजित कालरा,मोहन सब्रवाल,सुनिल मसिह, बिंदर सरोया, तरसेन दिवाना, कुलजीतसिह खोसला इत्यादी च्या प्रचार समितीच्या माध्यमातून नऊ विधानसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हाचा प्रचार अतिशय जोमाने सुरू आहे.
धम्मयान मीडिया
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत