प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान

चांदणी चौकातील फुल पादच्याऱ्यासाठी बनला डेंजर झोन

महानगरपालिकेने या चौकात आता सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार पदपथ, पादचारी उड्डाणपूल तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार केला आहे . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करून चांदणी चौकात पूल बांधला. मोठा गाजावाजा करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या उद्घाटनाला महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होते. मात्र आता हाच चांदणी चौकातील पूल हा पादचाऱ्यांसाठी डेंजर झोन बनला आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 14 ठिकाणी हा पूल पादचाऱ्यांसाठी धोकादायक असल्याचे समोर आला आहे.
महानगरपालिकेने या चौकात आता सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार पदपथ, पादचारी उड्डाणपूल तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार केला आहे. हा आराखडा अंतिम करून तो अंदाज समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.
या चौकात पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडणे, चारही दिशांना सुरक्षित जाण्यासाठी सुमारे चार किलोमीटरचे पदपथ तयार करण्याची आवश्यकता आहे. रस्ता ओलांडण्यासाठी एक पूल प्रस्तावित केला जाणार आहे. तो सर्व रस्त्यांवरून येणाऱ्या पदपथांना जोडला जाणार आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार जिने तयार केले जाणार आहेत. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावून नागरिकांना सुरक्षित रस्ता ओलांडता येईल यासाठी उपयोजना करण्यात येतील.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!