अत्यंत कमी खर्चात परदेशी शिक्षणाच्या संधी!


भूषण रामटेके
अत्यंत कमी खर्चात परदेशी शिक्षणाच्या संधी! पालक आणि इच्छुक विद्यार्थी यांचेकरिता विशेष माहिती आणि ऍडमिशन प्रक्रियेकरिता सेमिनार:
आंबेडकराईट एज्युकेटर्स ग्रुप (AEG) महाराष्ट्र तर्फे परदेशातील शिक्षण कसे प्रत्येक पालकाला परवडू शकेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी हे परदेशातील शिक्षण घेऊन तिथे मोठे करिअर करू शकतील या विषयावर दिनांक 19.05.2024 , रविवार , दुपारी 1.00 वाजता विद्यार्थी आणि पालकांकरिता मार्गदर्शन व पुढील बॅच ऍडमिशन कार्यक्रम online आयोजित करण्यात येत आहे .
एप्रिल महिन्यातील सेमिनार झाल्यावर पालकांच्या मागणीमुळे आता पुन्हा मे महिन्यात हा सेमिनार घेण्यात येत आहे.
याकरिता पालक किंवा विद्यार्थ्यांनी खालील गुगल फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करावे. https://forms.gle/p8YrqSyFv3VS57au6
सर्व विषयांमध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट किंवा त्यापुढील शिक्षणाच्या विविध संधींबाबत जसे की , ENGINEERING, MBBS, B.Sc , BCOM , BBA, Nursing, Pharmacy, Journalism, MBA, MS , Doctorate ई. बाबत मार्गदर्शन होणार आहे. परदेशातील 700 नामांकित विद्यापीठामध्ये असलेल्या संधी AEG मार्फ़त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोचणार आहेत.
AEG मार्फत मागच्या वर्षी जगातील 50 विद्यापीठांच्या प्रतिनिधीना बोलावून AEG चे हेडक्वार्टर असलेल्या Seawoods Grand Central Mall नवी मुंबई येथे मोठा Study Abroad Expo कार्यक्रम घेण्यात आलेला होता. त्यामध्ये 814 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
आता महाराष्ट्रातील प्रत्येक इच्छुक पालक व विद्यार्थ्याला सहभाग घेता यावा आणि मार्गदर्शन मिळावे या हेतूने हा कार्यक्रम online घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला मा. आर. के. गायकवाड IAS अधिकारी (से.नि.), माजी कमिशनर समाज कल्याण व माजी सचिव महाराष्ट्र शासन , हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या online कार्यक्रमाला रविवारी दि . 19.05.2024 ला दुपारी 1.00 वाजता जॉईन होण्याची गुगल मिटिंग लिंक खालीलप्रमाणे आहे :https://meet.google.com/ath-azjf-qju
भूषण रामटेके
आंबेडकराईट एज्युकेटर्स ग्रुप (AEG) महाराष्ट्र
तरी या उपयुक्त कार्यक्रमाची माहिती सर्व नातेवाईक, मित्र मंडळी, शिक्षक प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना forward करावी , ही विनंती.
अधिक माहिती करिता संपर्क : 8451862769, 8976621550
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत