भगवान बुद्धाची मूळ शिकवण( डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीतून )
हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर.
बौद्ध धम्मात, विचार स्वातंत्र, अभिव्यक्ती स्वातंत्र, समानता आणि बंधुता आहे. या गोष्टी इतर कोणत्याही धर्मात नाहीत. बुद्ध जर स्वतः म्हणतात की , त्यांनी सांगितले म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः विवेक विचार करून जर ते तुम्हाला पटले तरच स्वीकार करा. अन्यथा नाही. हा उपदेश बुद्धाने कालामांना दिलेल्या उपदेशात केलेला आहे. पुन्हा बुद्ध म्हणतात - कोणत्याही गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा केलीच पाहिजे. तसेच महापरिनिब्बाण सुत्तात, भिक्खू आनंदाला सुद्धा केला आहे.
म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या धम्मात आणि संघात त्रुटी असताना त्यावर बेधडकपणे उल्लेख करून त्यात विचारांना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य,समानता आणि बंधुता होती. इतर कोणत्याही धर्मात ते नाही. म्हणून त्यांनी बौद्ध धम्म स्वीकार केला. म्हणूनच त्यांनी आपले विचार स्वतंत्रपणे व्यक्त केले. अंधश्रद्धा ठेवून मान्य केले नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथात त्यांनी स्वतःचे प्रश्न निर्माण केले आणि बुद्धाचे जीवन आणि शिकवण यावर चर्चा करण्याचे आवाहन केले. ते परिचय मध्ये आपले विचार करताना म्हणतात -
भगवान ” बुद्धाचे जीवन आणि शिकवण ” सुसंगतपणे व संपूर्णत: सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे. निकयावर अवलंबून राहून बुद्धाचे जीवन कथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे. हे प्रत्यय येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे असे आढळते. जगात जेवढे धर्म संस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात ही अडचण निर्माण होते ही गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतीशयोक्त ठरणार नाही. हे प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धर्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय ? जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा. यासाठी अजून वेळ आली नाही काय ? या प्रश्नावर चर्चा व्हावी म्हणून ते इथे उदधृत करण्याचे मी योजित आहे
त्यानंतर त्यांनी चार प्रश्न मांडलेत. पहिला प्रश्न त्यांनी सत्य कसे जाणून घ्यावे? त्यासाठी उदाहरण म्हणून बुध्दाने परीव्रजा का घेतली ? हा प्रश्न मांडून त्यांनी स्वतः सोडवला. अगदी त्याचप्रमाणे बाकीचे तीन प्रश्न आणि बुद्धाचे जीवन आणि शिकवण यावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी जे जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांना आवाहन केले. हा प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली मांडला होता. आजपर्यंत किती बौद्ध धर्मियांनी यावर चर्चा केली आहे ? बुद्धा बद्दल सत्य समजून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी स्वतः चर्चा करण्याचे आवाहन केले असताना जर त्यांच्या धम्मात आणि शिकवणुकीत काही उणीवा असतील तर त्यात बुद्धाचे जीवन आणि शिकवण कशी समजून घेता येईल.? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः चार आर्यसत्य नाकारले आणि जीवन हे जर दुःख आहे, मृत्यू जर हे दुःख आहे..... तर धर्म तरी काय करू शकणार आणि अशा दुखापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकेल ? हा प्रश्न निर्माण केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगात एकमेव धर्मशास्त्र वेत्ता आहेत. त्यांना कोणीही नाकारू शकत नाही. तसेच आवाहन करू शकत नाही. म्हणूनच त्यांनी तो प्रश्न का केला आणि सोबतच त्यांनी बुद्धाला सरळ प्रश्न का केला ? याचे उत्तर जोपर्यंत आपण शोधू शकत नाही तोपर्यंत खरा बुद्ध धम्म आपणास समजणार नाही. मग बुद्ध धम्माचे सत्य कसे समजून घ्यायचे झोपलेल्या व्यक्तीला जागे करणे शक्य आहे पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करणे शक्य नाही याचा अर्थ असा की , जर कोणी पूर्वग्रहीत असेल तर त्यांच्या मनातील धारणा बदलणे शक्य नाही.
जोपर्यंत कोणीही अभ्यासक, तुलनात्मक अभ्यास आणि त्याचे आकलन योग्य प्रकारे करणार नाही तोपर्यंत धम्म तर सोडाच कोणत्याही गोष्टी समजणार नाही. मग ते राजकारण असो , धम्म असो , समाजकारण असो, किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो. बुद्धाच्या बाबतीत पण आपण सर्वजण फारच मोठा गैरसमज करून घेत आहोत. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीची जराही सखोल पणे चिंतन, मनन आणि वाचन करीतच नाही.आज आपणा सर्वांची सर्व क्षेत्रात जी उन्नती झाली आहे ती बुद्धामुळे नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या " भारतीय संविधानामुळे " आहे. फक्त भगवान बुद्धाचा धम्म हा मनुष्यास " निर्दोष जीवन " जगण्याची शिकवण देतो.
जरी बुद्धाच्या धम्मात शेकडा 90% भिक्षू ब्राह्मण होते आणि त्यांनी त्यांच्या मूळ शिकवणुकीला संपूर्णपणे विद्रूप केलेले आहे. सूत्तपिटक संपूर्णपणे विद्रूप करण्यात आले आहे संदर्भ - खंड - 20. पृष्ठ. क्रं.390 वाचा. *बारा कड्या मध्ये मनुष्य स्त्री सोबत काय काय चाळे करतो ते सांगितले आहे. आणि त्याचा परिणाम कामतृष्णा उत्तेजित होऊन सहवास करतो आणि जन्म देण्याची इच्छा करतो. त्या जन्मामुळे मृत्यू, शोक ,आक्रोश मनस्ताप उत्पन्न होतात. अर्थात -
मनुष्याने स्त्री सोबत सहवास केल्याने जन्म होतो आणि हाच जन्म दुःखास कारणीभूत आहे.
आणि हेच कारण जर दुःखास कारणीभूत आहे तर अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म तरी काय करू शकेल ? हा प्रश्न फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच परिचय मध्ये चारआर्य सत्याचे खंडन करताना केला आहे.
आता सांगा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली विचार योग्य आहे की नाही ? आपण बुद्धाला साक्षात देवच समज असल्याने बुद्धाच्या विरोधात काही शंका , प्रश्न निर्माण करीत नाही. बुद्धाने तर शिक्षणाबद्दल " ब्र " सुद्धा काढलेला नाही. ते अविद्या बद्दल सांगतात. पण त्यांनी " अविद्येची " व्याख्या " आध्यात्मिक " सांगितलेली आहे. पहा ते अविद्ये बद्दल काय सांगतात -
मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय हे उदात्त सत्य न समजणे म्हणजे अविद्या होय.
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं.97. अनु. क्रं.अनु. क्रं.19. प्रकरण – 4. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन (पुढे ) अष्टांगमार्ग किंवा सदाचाराचा मार्ग. द्वितीय खंड. भाग दुसरा.
यात शिक्षणाचा विद्येचा बुद्धाने सांगितलेल्या अविद्येचा काहीही संबंध नाही. पण अविद्याची खरी परिभाषा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे ती पण पहा –
विद्ये विन मती गेली
मती विना नीती गेली
नीती विना गती गेली
गती विना वित्त गेले
वित्त विना शूद्र खचले
एवढे –
अनर्थ एका अविद्येने केले.
बुद्धाची अविद्या आणि ज्योतिबा फुले यांची विद्या विना अर्थ एकच आहे. पण दोघांची परिभाषा या जमीन आसमांचा फरक आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांनी केलेल्या " विद्या विना " चा अर्थ मान्य केला आहे. बुद्धाने केलेल्या अविद्येला मान्य केले नाही. आणि हाच संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना दिला. शिक्षणाची व्यवस्था त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेत करून ठेवली आहे. त्यामुळेच आपणास शिक्षण मिळाले आणि सामाजिक , आर्थिक परिस्थितीमध्ये नेत्र दीपक सुधारणा केली.
आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनामुळे आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणा करतो पण श्रेय मात्र बुद्धाला देतो. ही आपली कृतज्ञता नाही काय ? म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठ्या दुःखी अंतकरणाने म्हणतात -
माझे आयुष्य मी तुमच्या हितार्थ वेचतो आहे. पण माझ्या पश्चात या समाजाचे कसे होईल ? ही माझी चिंता दूर करणारी माणसे तुमच्यात अजून तयार होऊ नयेत ? या सर्व गोष्टीचा विचार केला की , माझे आयुष्य तुमच्यासाठी फुकट खर्ची घातले असे वाटू लागते.
संदर्भ – खंड.18 भाग – 3. पृष्ठ. क्रं.315. पैरा – 1.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या मानसिक अवस्थेत हे उद्गार काढले असतील त्याची कल्पना करवत नाही. आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे भौतिक जीवनात सर्व सुख सुविधा भोगत आहोत.तीन पेटार्यामुळे नाही. बुद्धाच्या भिक्खु संघात शेकडा 90% ब्राह्मण भिक्खु सामील होऊन बुद्धाच्या मूळ शिकवणुकीला आणि उपदेशांना विद्रूप केलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या कम्मसिद्धांत बाबतीत काय म्हणतात ते भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म.पृष्ठ. क्रं.192 अनु. क्रं.13 ते 22. तृतीय खंड. भाग चवथा. प्रकरण – 1. अवश्य वाचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मप्रसारासाठी विपश्यना, ध्यान साधना आणि अभिधम्मपिटक घातक आहे असे म्हटले आहे.
I will now turn to the preliminary step which must be taken for the revival of Buddhism in india. I mention below those that occur to me.
( i )
The preparation of a Buddhist gospel which could be a constant companion of the convert. The want of a Small gospel containng the teachings of the Buddha is a great handicap in the propagation of Buddhism. The common man cannot be expected to read 73 volumes of the pali cannon. Christianity has a great advantages over Buddhism in having the message of christ contained in a small booklet the Bibel. This handicap in the way of the propagation of Buddism must be removed. In regard to the preparation of Buddha ‘s gospel care must be taken to emphasise the social and moral teachings of the Buddha. I have to emphasise this because what is meditation, contemplation and Abhidhamma. This way of presenting Buddhism to Indians would be fatal to our cause.
संदर्भ – खंड – 17. भाग – 3. पृष्ठ. क्रं.508.6 ( i ). मराठीत अर्थ –
भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचा ग्रंथ तयार करताना त्यांच्या सामाजिक व नैतिक शिकवणुकीवर भर देण्याची काळजी घेतली पाहिजे. मला त्यांच्या या शिकवणुकीवर भर देण्याची आवश्यकता वाटते कारण भर न देता " ध्यान आणि चिंतन " व अभीधम्मावर अधिक भर दिला जातो. भारतीय साठी अशाप्रकारे बुद्ध धम्माला प्रस्तुत करणे आपल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी हानिकारक घातक ठरू शकते.
वरील संदर्भानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ध्यान, चिंतन आणि अभीधम्म पिटकाला स्पष्टपणे नाकारले आहे
तूर्तास एवढेच !
लेखक –
आद.माणिक वानखेडे सर
9860761826
वर्धा.
दि.1 फरवारी 24
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत