नव्या पिढीचे दुषण (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीतून)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी मनुस्मृतीचे दहन करून त्या जागी भारतीय संविधानाची निर्मिती करून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ह्या प्रणालीनुसार स्त्रीला न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी म्हणून संरचना केली आहे. भारताची राज्यघटना लिहिण्या अगोदर त्यांनी सर्व राष्ट्रांची परिस्थिती आणि घटना समजून घेऊन गाढा अभ्यास करून भारतात असलेली जातीयता, धर्मांधता ही जास्त प्रमाणात बोकाडलेली होती. तत्पूर्वी भारताची राज्यघटना आणि इतर देशाची घटना याची तफावत सांगून ही कशी असावी याविषयी स्वतःचे मत मांडताना ते म्हणतात -
अस्पृश्य वरील हिंदूंच्या सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक वर्चस्वात आणखी राजकीय वर्चस्वाची भर पडणार असेल, तर ती मी सहन करणार नाही. आंबेडकरांनी काँग्रेसला स्पॅनिश साम्राज्यातून फुटून निघालेल्या स्पॅनिश अमेरिकन वसाहतीची गत काय झाली त्याची आठवण दिली. त्या वसाहत वाल्यांनी ब्रिटनच्या जेरेमी बेनथॅमला आपली राज्यघटना करण्यासाठी आमंत्रिले. बेनथँमने गलबते भरून इंग्लंडहून ग्रंथ सामुग्री मागविली. त्याने बनवलेली राज्यघटना त्या देशात कशी सपशेल पडली आणि तिची जाहीर होळी कशी झाली याचे आंबेडकरांनी स्मरण करून दिले. “राज्यघटना ही पोशाखाप्रमाणे अंगास चांगली चपखल बसली पाहिजे असेही त्यांनी सांगितले
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र.धनंजय कीर. पृष्ठ. क्रं.363. पैरा – 1.
जसे खैरलांजी हत्याकांड , मणिपूर घटना , मनोरमा कांबळे हत्याकांड आणी पुन्हा दिवसेंदिवस वाढत असलेला अन्याय अत्याचार अशी कित्येक उदाहरणं देता येईल की, सदर प्रकरणात सबळ पुराव्यातील पोस्टमार्टम , प्रत्यक्ष दर्शनी पुरावे असून सुद्धा आरोपी सही सलामत निर्दोष सुटलेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या ह्यातीत त्यांनी प्रत्यक्ष भोगलेल्या मरणप्राय यातना पाहून भारतातील बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय, अत्याचारा वर वाचा फोडण्यासाठी, न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटून , स्वतःच्या तल्लख बुद्धीचा कस लावून, परिस्थितीचे अवलोकन करून राज्यघटनेची निर्मिती केली. आणी ते म्हणतात - माझ्या जागी दुसरा असता तर त्याचा समूळ नाश झाला असता एवढी भयावह परिस्थिती दूरदृष्टीपणा ठेवून मी समय सूचकतेनुसार बुद्धिमत्तेचा तल्लख असल्यामुळे मी कट्टर विरोधकास सामना करू शकलो. पण माझ्या निघून जाण्याने माझ्या समाज बांधवावर पूर्वाश्रित परिस्थिती उद्भवू नये , न्याय मागण्याचा हक्क मिळावा अशी भारतीय संविधानाची चौकट न्यायदालनाची सर्वांसाठी खुली करून दिली. पण घटना राबविणारे जर विकृत बुद्धीचे असतील तर मी तयार केलेली घटना काय कामाची ? कोणते फलित साधणार ? हाच त्यांच्या मनी संशय होता. तो आजच्या घडीला उपरोक्त प्रकरणातून ठळकपणे दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाही बद्दलचे मत जाणून घेऊ. ते म्हणतात -
ह्या देशात लोकशाही आहे. परंतु त्या लोकशाहीने आपली बुद्धी चालवण्याचे स्थगित केले आहे. तिने आपले हातपाय एकाच पक्षाशी जखडून ठेवले आहेत. त्या पक्षाचे विचार आणि त्याची कृती याविषयी कठोर चिकित्सा करून न्याय निवाडा करण्याची तिची तयारी नाही. माझ्या मते हे मोठे दुखणे आहे, तो एक रोग आहे, मोठे आजारपण आहे. त्या रोगाने आपल्या सर्व लोकांना पछाडले आहे. त्याने ते बधीर झाले आहेत. मोठी दुर्दैवाची गोष्ट अशी की, " हिंदी लोक परंपरेने बुद्धिवादी नसून अतिरिक्त श्रद्धाळू वृत्तीचे आहेत. जो सर्वसामान्य माणसाहून विक्षीप्तपणे वागतो आणि तो त्या विक्षीप्त वागण्यामुळे इतर देशात पागल ठरेल. तो ह्या देशात महात्मा किंवा योगी ठरतो. आणि धनगराच्या पाठीमागून जशी मेंढरे जातात तसे लोक त्यांच्या पाठीमागून जाऊ लागतात..
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.331. पैरा – 2.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे आतापर्यंत आपण स्वतंत्र वृत्तीने, विचाराने कसेबसे तरी श्वास घेत आहोत.पण आपल्या पुढची येणारी पिढी ह्यांना आपण काय जवाब देणार ? ते हेच म्हणतील , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या परीने देशहीत, समाजहीत जपून महान असे सर्वोत्तम कार्य केले, जोपर्यंत आकाशात सूर्य , चंद्र तारे आहेत तोपर्यंत आम्ही मोकळा श्वास घेऊ शकलो असतो पण मागच्या पिढीने त्यांच्या विचारांची पूर्णपणे पायमल्ली करून , समाजातील गद्दार पुढार्यांनी हेवेदावे करून अमिषा पोटी पार धुळीस मिळून टाकले. असे दुषण नक्कीच देतील...हीच आपली नव्या पिढी समोर खोटारडी छाप राहुन त्यांना तोंड दाखवण्याची आपली लायकी राहणार नाही. सत्याची कास धरावी याविषयी तरुणांना उपदेश देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते पहा -
तरुण बंधूंनी, " आत एक बाहेर एक " असली सवय लागू देऊ नये. सत्य सोडू नका. सत्याचा तात्कालीक जरी विजय नसला तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. आपल्यात दुटप्पीपणा असता कामा नये." जगाला जर हा मनुष्य दूतोंडी आहे असे दिसले तर मग जग आपल्यावर विश्वास ठेवणार नाही."
संदर्भ – खंड.18 भाग – 2. पृष्ठ. क्रं.116. पैरा – शेवटचा.
उपरोक्त संदर्भानुसार जगाला जर हा मनुष्य दूतोंडी आहे असे दिसले तर मग जग आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. हा फार मोलाचा संदेश देऊन जगासमोर आपली छाप पाडण्यासाठी स्वाभिमानी, निष्ठावान आणि सत्याची कास धरणारी माणसे ही नव्या पिढीला संदेश देणारी असावीत असा शब्दप्रयोग केला आहे.
हंसराज कांबळे
8626021520
नागपूर. दि.9 मार्च 24.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत