अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त सोमवारी कार्यक्रम

सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य साधून दि. 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार असून, यामध्ये अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काबाबत जाणिव, माहिती करून देण्यात येणार आहे. तसेच, केंद्र व राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व प्रधानमंत्री यांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील व समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत